![]()
प्रतिनिधी | कन्नड अमर्याद तृष्णेमुळे संपूर्ण पृथ्वी धोक्यात सापडली आहे. साम्राज्यवादामुळे युद्ध, कलह वाढत आहेत. धोक्यात आलेल्या पृथ्वीस तथागत गौतम बुध्दांचे विचारच तारतील असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रहार ढोकणे यांनी बौध्द पौर्णिमा उत्सवात केले. बुद्ध पौर्णिमेनिमित्त त्रिशरण बुद्ध विहारात बौद्ध पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी ‘युद्ध नको बुद्ध हवा’ व ‘अत्त दिप भव’ या उपक्रमांतर्गत एकाच वेळी चंद्राला साक्षी ठेवून हजारो मेणबत्त्या पेटवून म्हाडा कॉलनी ते त्रिशरण बुद्ध विहार अशी मेणबत्ती रॅली काढण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून विलास शिरसाठ, डॉ. अश्विन भडांगे, नगरसेवक अब्दुल जावेद, विद्या काशिनंद, युवराज बनकर, तलाठी नितीन मगरे, माणिक पगारे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक विनोद अंभोरे यांनी केले. याप्रसंगी जितेंद्र साठे, राहुल इंगळे, सतीश नाडे, अजय सातदिवे ,राहुल डोंगरे, गौतम जाधव, अशोक जाधव, प्रदीप जाधव , राजेंद्र पगारे, राकेश पवार, सुनील सिरसाठ, किरण राठोड, गोकुळ राठोड, राजू अवचार, बाळकृष्ण पगारे, आनंद जाधव, बंटी काशिनंद, महेंद्र काशीनंद, नाना शिरसाठ, विजयकुमार अमृतफळे, शाम मोरे, रविंद्र जाधव आदी उपस्थित होते. कन्नड शहरामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची मिरवणूक लक्षवेधी यावेळी तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्तीची मिरवणूक लक्षवेधी ठरली. या रॅलीने शहर वासियांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी ‘युद्ध नको बुद्ध हवा’ अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ढोकणे यांनी आपले विचार मांडले. यावेळी मिलिंद पाटील म्हणाले की, मैत्री, शांती, करूणेचा बुध्दांचा विचार स्विकारल्याशिवाय जगात सुव्यवस्था निर्माण होणार नाही. अध्यक्षस्थानी डॉ. प्रतिभा अहिरे होत्या. यावेळी मुद्रांक जिल्हाधिकारी गोरख सातदिवे, तहसीलदार सारिका भगत, नभाताई ढोकणे, नगराध्यक्ष फरीन बेगम, जिल्हा परिषद सदस्य डॉ. संजय गव्हाणे यांची भाषणे झाली.
Source link
संकटात असलेल्या पृथ्वीला तथागत गौतम बुध्दांचे विचार तारतील- ढोकणे:चंद्राला साक्षी ठेवून हजारो मेणबत्त्या केल्या प्रज्वलित