![]()
शिवसेना शिंदे गटात गेलेले ठाकरे गटातील फुटीर नेते संजय दिना पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना असभ्य भाषेचा वापर केला होता. यावरून चांगलेच राजकारण पेटले होते. मुंबई पत्रकार संघाने या विरोधात निदर्शने देखील केली. अधिवेशनात देखील हा मुद्दा गाजला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमध्ये असले प्रकार चालणार नाही, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वांना सुनावले होते. त्यानंतर आता संजय दिना पाटील यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून माफी मागितली आहे. संजय दिना पाटील म्हणाले, जो प्रकार माझ्यात आणि पत्रकारांमध्ये हा झालेला आहे, त्याच्यासाठी मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आणि हा प्रकार का घडला हे जरा आपल्याला सांगू इच्छितो. ज्या दिवसापासून मी शिवसेनेत प्रवेश केलाय, त्या दिवसापासून एकदम वाईट शब्दात आणि शिव्यागाळ करून मला जे अपमान करत होते, तरी पण मी सर्व अपमान सहन केले. तरीसुद्धा आज सकाळी परत ते पत्रकार मित्र आले होते, मी त्यांना हात जोडून विनंती केली की बाबा याबद्दल आपण काहीही मला विचारू नका. जे मला काय बोलायचं होतं ते मी सर्व बोलून झालेलं आहे, आता कृपा करून काही बोलू नका. माझ्या परिवाराला लांब ठेवण्याची विनंती केली होती पुढे संजय दिना पाटील म्हणाले, मी हात जोडून त्यांना विनंती केली, वारंवार मी सांगत आलेलो आहे की बाबा हे सर्व प्रकार हा माझा आहे. मला आपण जे शिव्या देताय ते ठीक आहे, पण माझ्या परिवाराला, माझ्या मुलीला, माझ्या पत्नीला, माझ्या वडिलांना, माझ्या परिवाराला आपण जे वाईट बोलताय, शिव्या देताय, त्यापासून त्यांना जरा लांब ठेवा असं मी त्यांना वारंवार विनंती करत आलो. तरीसुद्धा आज सकाळी पण पुन्हा एकदा माझ्या पत्नीबद्दल, माझ्या वडिलांबद्दल वाईट शब्द, वाईट गोष्टी सांगण्यात आल्या, खोट्या गोष्टी सांगण्यात आल्या. आणि तरी ते पत्रकार त्याच गोष्टी परत विचारणा करत आल्या. विनंती करूनही प्रश्न सुरू, त्यामुळे वाद झाला माझ्याकडून त्यांना विनंती करण्यात आली, पण त्यांनी न थांबता ते चालू राहिले, त्याच्यात जरा वाद जरा जास्त झाला. माझ्याकडून चुकीने काहीतरी अपशब्द निघाले, मी त्याकरता पुन्हा एकदा त्या पत्रकारांची आणि पूर्ण पत्रकार समूहाची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि हे का होतंय हे मी आपल्याला सांगितलंय. कृपा करून आपण मी जे केलंय, मी जे प्रवेश केलाय, त्याच्यासाठी ठीक आहे, पण माझ्या परिवाराला, माझ्या मुलीला, माझ्या परिवाराला, माझ्या पत्नीला, माझ्या वडिलांना जे हयात नाहीये, माझ्या आईला आणि माझ्या पूर्ण परिवाराला याच्यापासून जरा लांब ठेवा अशी मी त्यांना विनंती करतो, अशा शब्दांत संजय दिना पाटील यांनी आपली दिलगिरी व्यक्त केली आहे.
Source link
संजय दिना पाटलांचा अखेर माफीनामा:आधी पत्रकारांना शिवीगाळ, टीकेची झोड उठताच दिलगिरी व्यक्त; काय म्हणाले पाटील?