Headlines

संभाजीनगरचा महेश कुंभार मोशीतील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकला:चमत्कार घडावा अन् माझा भाऊ जिवंत असावा; संतोष कुंभारची भावना



मोशीतील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली महेश कुंभार अडकला आहे. ३२ वर्षीय महेश मूळचा छत्रपती संभाजीनगरचा. एमबीएचं शिक्षण घेतल्यावर तो वेस्ट एनर्जी प्रकल्पात वर्षभरापासून एचआर म्हणून नोकरीस लागला. दुर्घटनेत महेश इमारतीत अडकल्याचे त्याच्या कुटुंबीयांना मध्यरात्

.

मात्र, तो होऊ शकला नाही. त्यानंतर महेशचा भाऊ संतोष कुंभार तातडीने घटनास्थळी पोहोचला. आपला भाऊ सुरक्षित असेल, या विचारात तो आला, पण महेश इमारतीत अडकून असल्याचे त्याला सांगण्यात आले. आता काहीतरी चमत्कार घडेल आणि आपला भाऊ जिवंत असेल, असं संतोषला वाटतंय.

आधी सहा, नंतर तिघांना बाहेर काढले

इमारत कोसळताच अशोक गुप्ता, मुनेंद्र कुमार, चंद्रशेखर सिंह, दिनेश सुतार आणि श्री बाला बाहेर पडले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, भारतीय सेना, पिंपरी-चिंचवड मनपा अग्निशमन विभाग, पीएमआरडीए अग्निशमन दल आणि पोलिसांनी बचावकार्य सुरू केले. बुधवारी रात्री आधी सोमनाथ शेळके, सचिन दवडगाव, दादासाहेब आरडे, सुजाता शिंदे, रामप्रताप चव्हाण आणि रणवीर सिंह व त्यानंतर विजय सपकाळ, भूषण पाटील आणि महेश राऊत यांना बाहेर काढण्यात आले. दरम्यान, महेश कुंभार, ⁠सनी माने, राहुल गायकवाड, ⁠सुनील कोरके, ⁠अक्षय सावंत,⁠रणजीत पाटील, ⁠नागेश गायकवाड आणि ⁠वामन कसबे हे ढिगाऱ्याखाली अडकले.

दरडीसारखा कचऱ्याचा डोंगर पडल्याने लगेच कुणाला दोषी धरता येणार नाही

मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी मनपा आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी धक्कादायक वक्तव्य केले. ते म्हणाले की, ज्याप्रकारे नैसर्गिक आपत्तीमध्ये दरड पडते त्याच पद्धतीने कचऱ्याचा डोंगर इमारतीवर पडल्याने ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये लगेच कुणाला दोषी धरता येणार नाही. इमारत कचऱ्याच्या ढिगाऱ्यापासून ३० मीटर अंतरावर असल्याने तिला संरक्षक भिंत बांधण्याची गरज वाटली नाही. निकष पालन करूनच इमारत बांधकाम झाले होते. येथे १९८२ पासून रोज १३०० ते १४०० मेट्रिक टन कचरा वर्गीकरण करून त्याचे वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात प्रक्रिया करण्यात येत होती. अनेक वर्षांपासून कचरा साचल्याने डोंगर निर्माण झाला. हा डोंगर पडेल अशी शक्यता आम्हाला वाटली नव्हती. तीन दिवसांच्या पावसाने ही दुर्घटना घडली. खासदार बारणे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने तीन वर्षांपूर्वी उद्घाटन झालेल्या मोशी कचरा डेपो वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाला केंद्र सरकारने १३५० कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. येथील इमारत नियमानुसार उभारली आहे का, याची चौकशी करावी. दोषी अधिकारी, ठेकेदारांवर कारवाई व्हावी. प्राण गमावलेल्याच्या कुटुंबातील एका सदस्याला मनपात नोकरी मिळावी. ज्येष्ठ नगरसेविका सुलभा उबाळे म्हणाल्या की, या दुर्घटनेची एसआयटीमार्फत चौकशी केली जावी. कचऱ्याच्या डोंगराची उंची जास्तीत जास्त २० मीटर ठेवता येते. परंतु येथे ३० मीटरपेक्षा अधिक उंचीचा डोंगर आहे.

पंढरपूरचे सुनील बाळाला पाहून गेले अन् अडकले

पिंपरी-चिंचवडच्या मोशी दुर्घटनेतील इमारतीत सुनील कोरके अडकले. त्यांचे जुळे बंधू अनिल कोरके थेट कामावरून आहे तसे कचरा डेपोत पोहचले. मात्र सुनीलचा थांगपत्ता लागत नसल्याने ते चिंतित आहेत. माझा भाऊ येईल अन् मला भेटेल, या आशेवर ते इथे थांबले आहेत. मूळचे पंढरपूरचे सुनील तीन दिवसांपूर्वी घरी गेले होते. नऊ वर्षांनंतर जन्मलेल्या एक महिन्याच्या बाळाला तो भेटला अन् पुन्हा मोशी कचरा डेपोत कामासाठी परतला. पण ही दुर्घटना घडली अन् तो यात अडकल्याचे अनिल म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *