Headlines

संभाजीनगरातील उपायुक्त कार्यालयातील ग्रेड पीएसआयकडून शिक्षिकेवर अत्याचार:गुन्हा दाखल होताच आरोपी पसार, सीपींकडे अहवाल सादर




शहरातील उपायुक्त कार्यालयात वाचक म्हणून कार्यरत ग्रेड पीएसआय हरीश माधवराव खटावकर (५३) याने खासगी शाळेतील शिक्षिकेवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. खटावकर याची पीडितेशी ४ वर्षांपूर्वीची ओळख होती. त्याने मे २०२५ ते १५ जुलै २०२६ या काळात हॉटेलमध्ये काम असल्याचे सांगून तसेच घराचे इंटेरिअर बघण्याच्या बहाण्याने बोलावून पीडितेवर अत्याचार केला. नकार दिल्यास पतीला सांगून बदनामी करण्याची धमकी तो देत होता. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच खटावकर पसार झाला आहे. उपायुक्त कार्यालयाने सविस्तर अहवाल पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांना पाठवला असून, त्याच्यावर लवकरच कायदेशीर कारवाई केली जाईल. पतीने जाब विचारताच राडा खटावकर पत्नीला मेसेज करत असल्याचे समजताच पतीने त्याला जाब विचारला.तेव्हा ‘माझे तिच्यावर प्रेम आहे,’ असे सांगून त्याने फोन कट केला. बुधवारी संध्याकाळी ७ वाजता तो पीडितेच्या घरी पोहोचला. पतीने तिला घराबाहेर काढले. त्यानंतर खटावकरने तिला कारमध्ये बसवून मारहाण केली. सय्यद निसार ही कार चालवत होता. रात्री १० वाजता तिचा मोबाइल हिसकावून घेत खटावकरने तिला दूध डेअरी चौकात उतरवून दिले आणि तो निघून गेला. ११ वर्षांपूर्वीही झाली होती निलंबनाची कारवाई आरोपी खटावकर १९९३ साली पोलिस दलात भरती झाला. शहरात विविध पोलिस ठाण्यांत काम केल्यानंतर सध्या तो परिमंडळ २ कार्यालयात वाचक म्हणून कार्यरत आहे. ११ वर्षांपूर्वी एका पीडितेशी वाईट बोलल्याप्रकरणी त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *