एल निनोचा तीव्र तडाखा महाराष्ट्राला बसत आहे. १६ जुलैपर्यंत राज्यात सरासरी ३७८.४ मिमी पाऊस पडणे अपेक्षित आहे, प्रत्यक्षात ३३६.२ मिमी पाऊस झाला. म्हणजे ११.२ टक्के तूट पडली आहे. दोन आठवड्यांपूर्वी पुणे, मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस झाला. परंतु राज्याच्या
.
विदर्भ आणि मराठवाड्यात परिस्थिती बिकट आहे. गेल्या वर्षी १६ जुलै २०२५ पर्यंत नागपूर विभागात ११३.६% पाऊस झाला होता. यंदा १६ जुलै २०२६ पर्यंत, नागपूर विभागात तो ५८.६% आहे. अमरावती विभागातही गेल्या वर्षीच्या १००.६ च्या तुलनेत यंदा ७३.६% पाऊस झाला. मराठवाड्यात गेल्या वर्षी ६४.३ तर यंदा ७२.४ टक्के पाऊस झाला. यंदा नाशिक ६८.४ आणि पुणे विभाग ८७% पावसाची नोंद झाली. कोकणात गेल्या वर्षीच्या ९२.६ च्या तुलनेत यंदा १०९% पाऊस झाला आहे.
यंदाची स्थिती काय?
गतवर्षीच्या चांगल्या पावसानंतर यंदा २०२६ मध्ये प्रशांत महासागरातील बदलत्या हवामान स्थितीमुळे मान्सूनच्या प्रवासात अडथळे येत आहेत. मान्सून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात दाखल झाला असला तरी हंगामाच्या मुख्य काळात पावसाचा मोठा खंड राहण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे.
बाष्पयुक्त वारे सह्याद्रीपर्यंत पोहोचून कमजोर पडले हवामान बदल एल निनोचा परिणाम यंदा महाराष्ट्राला जाणवत आहे. यात कमी वेळेत जास्त पाऊस किंवा दीर्घकाळ कोरडा दुष्काळ अशी टोकाची परिस्थिती निर्माण होते.

डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ
प्रशासनाने आतापासूनच पाणीटंचाईसाठी तयार राहावे
यंदा राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल, त्यामध्ये मोठे खंडही असतील. परतीचा पाऊस जो १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरदरम्यान असतो तोही कमी राहणार आहे. एकूण पाऊसच कमी असल्यामुळे धरणे आणि तलावही पूर्ण भरणार नाहीत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची चणचण राहणार. यासाठी प्रशासनाने आतापासूनच पाणीटंचाईसाठी तयार राहिले पाहिजे.