Headlines

संभाजीनगरात 250 कोटींच्या 300 एकर शेतीची मालकी परस्पर काढली:म्हैसमाळ, वेरूळसारख्या पर्यटनस्थळांच्या परिसरातील शेतकऱ्यांचा मालकी हक्क असताना प्रशासनाने जमिनी परस्पर वर्ग-2 केल्या




वर्ग-2 च्या इनामी जमिनी वर्ग-1 मध्ये रूपांतरित करण्यासाठी शेतकरी वर्षानुवर्षे महसूल कार्यालयांचे उंबरठे झिजवतात. छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी अगदी उलटा प्रकार केला आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळे असलेले म्हैसमाळ, वेरूळ आणि खुलताबादच्या 300 हून अधिक शेतकऱ्यांच्या वर्ग-1 च्या जमिनी नोटीस न देताच परस्पर वर्ग-2 करून टाकल्या आहेत. विशेष म्हणजे या जमिनीच्या एकरी किमती 250 कोटींपेक्षा अधिक आहेत. आपला मालकी हक्क संपल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तहसीलदारांनी बोलणे टाळले ‘दिव्य मराठी’ने म्हैसमाळ, वेरूळ, खुलताबादच्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. 1950 ते 1965 दरम्यानच्या मूळ 7/12, नोंदणीकृत खरेदी खते, वारसाहक्क नोंदी आणि कर पावत्या तपासल्या तर त्यावर ‘भोगवटादार वर्ग-1’ उल्लेख दिसून आला. तहसील कार्यालयामध्ये कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे सांगत शेतकऱ्यांना वैजापूर, कन्नड, खुलताबादला पायपीट करावी लागते आहे. खुलताबादचे तहसीलदार संतोष गुट्टे यांनी मात्र हा प्रकार आपल्या कार्यकाळात झाला नसल्याचे सांगत यावर प्रतिक्रिया देणे टाळले. एक्स्पर्ट व्ह्यू ॲड. अभयसिंह भोसले, महसूल कायदेतज्ज्ञ ही कृती बेकायदेशीरच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 255 नुसार वर्गवारीत बदल करण्यापूर्वी नोटीस देणे व सुनावणी घेण्याचे बंधन आहे. महसूलची कारवाई बेकायदेशीर आहे. खंडपीठात जनहित याचिका दाखल करता येऊ शकते. ‘दिव्य मराठी’ने बांधावर जाऊन तपासले सर्व रेकॉर्ड केस 1 : जमीन विकून कर्ज फेडायचे होते, आता हतबल वेरूळ येथील अशोक रंधे म्हणतात,‘55 एकर वडिलोपार्जित वर्ग-1 जमीन होती. त्यावर शेतीपूरक व्यवसायासाठी 2 कोटी कर्ज घेतले. कर्ज फेडण्यासाठी काही जमीन विकायची होती. मात्र, जमीन वर्ग-2 झाल्याने आता माझीच जमीन असून मला विकता येत नाही. कर्जामुळे जप्तीची टांगती तलवार आहे. जमिनीचे भाव एकदम पडले आहेत. काय करावे मला काहीच कळत नाही.’ केस 2 : महिला हॉटेल व्यावसायिक रस्त्यावर कविता देवलवार म्हणाल्या, माझे पती दिवंगत राजीव यांनी 2003 मध्ये म्हैसमाळला हॉटेलसाठी वर्ग-1 ची 33,000 चौ.फूट जागा घेतली. ग्रामपंचायतीचा कर भरून बांधकाम परवाना काढला. पण वर्ग-2 झाल्याने आता हॉटेलचे काम थांबवावे लागले.’ केस 3 : एका झटक्यात पिढ्यांची मालकी संपली खुलताबादचे ज्ञानेश्वर पवार यांच्या मते, ‘1965 पासूनच्या 10 एकरच्या सातबाऱ्यावर वर्ग-1 नोंद होती. कर्जासाठी बँकेत गेलो तर वर्ग-2 ची नोंद आढळली. त्यामुळे कर्जाचा माझा अर्ज बँकेने फेटाळला. प्रशासनाने आमच्याच जमिनी असूनसुद्धा आम्हाला मालकीपासून बेदखल केले आहे. कुठे दाद मागावी आम्हाला काहीच कळेना.’ थेट सवाल
जनार्दन विधाते, निवासी उपजिल्हाधिकारी, संभाजीनगर या सातबाऱ्यामध्ये 2012 दरम्यान एकूण 11 शेतकऱ्यांची नावे आहेत. त्या वेळी त्यांचा मालकी हक्क होता.
महसूल विभागाने परस्पर फेरफार करून पूर्ण 135 गट वर्ग-2 केलाय. त्यामुळे मालकी हक्क संपला आहे. 18 नोव्हेंबर 2025 रोजी फेरफार करून गट क्र. 135 वर्ग-2 केला
म्हैसमाळच्या 4.64 हेक्टरची मालकी काढल्याचा पुरावा
12 जानेवारी 2012 रोजी गट क्र.135 ची शेती मालकीची होती वर्ग-1 ची जमीन थेट वर्ग-2 कशी काय करण्यात आली? – नियमानुसार अशी वर्गवारी बदलता येत नाही. शेतकऱ्यांनी चिंता करू नये. पूर्ववत करून देता येईल. मग या शेतकऱ्यांच्या 7/12 उताऱ्यांवर हा बदल कसा झाला? – 7/12 अद्ययावतीकरणाच्या मोहिमेत अन् डेटा मायग्रेशन-संगणकीकरणात ही चूक झाली. आता तोडगा काढण्यासाठी काय उपाययोजना करता येईल? – मूळ वर्ग-1 जमीन वर्ग-1 च राहील. 1950 नंतरच्या पुराव्यानिशी तहसीलदारांना अर्ज द्यावा लागेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *