![]()
मराठा समाजाला दिले जाणारे आरक्षण हे कायद्याच्या चौकटीत टिकणारे असावे, ही सरकारची भूमिका आहे. घाईत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. मराठा आरक्षण देताना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मार्ग काढला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परभणी येथील मेळाव्यात दिली. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या तीव्र विरोधानंतरही परभणीत शिवसेनेच्या युवा संवाद व शेतकरी मेळावा पार पडला. जरांगे यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. मराठा आरक्षण देताना इतर आरक्षणाला धक्का न लावता मार्ग काढला जाईल, असे आश्वासन या मेळाव्यात शिंदे यांनी दिले. त्यांनी शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहितीही दिली. अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जात आहे. कृषी अवजारे, वीज बिलात सवलत, सौर कृषी पंपांचा विस्तार या योजनांना मराठवाड्यात प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, सरकारच्या शिष्टमंडळासोबत माझी कोणतीही बोलणी झालेली नाही. मी कोणाचीही वाट पाहत नाही. आता सरकारला वेळ वाढवून मिळणार नाही. मराठा समाजाला मुंबईत जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. आंदोलनाबाबत चर्चेची दारे खुली : मुख्यमंत्री नागपूर | मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर यापूर्वीही आपण चर्चेतून मार्ग काढला आहे. भविष्यातही यातून नक्कीच सकारात्मक मार्ग काढणार आहोत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात बोलताना दिली. ते म्हणाले की कायदेशीरदृष्ट्या सर्व रास्त व योग्य मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारची चर्चेची दारे कायम खुली आहेत. जरांगेंनी खडसावले, जाधवांची सभेत माफी जरांगे यांनी खासदार संजय जाधव यांना फोन करून कार्यक्रम रद्द करण्याची ताकीद दिली होती. त्यानंतर शिंदे सेनेचे बच्चू कडू यांनी फोनवरून जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तर, १५ दिवसांपासून तयारी सुरू होती. ऐनवेळी कार्यक्रम रद्द केला असता तर शेतकऱ्यांनी मला मारले असते, अशा धर्मसंकटात मी सापडलो होतो, असे सांगत खा. जाधव यांनी मेळाव्यात जरांगेंची जाहीर माफी मागितली.
Source link
जरांगेंच्या विरोधानंतरही परभणीत मेळावा, मुंबईला जाणारच- जरांगेंचा इशारा:इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार- उपमुख्यमंत्री शिंदे