![]()
पवित्र पाणी घेऊन पिनाकेश्वर महादेवाच्या डोंगराकडे निघालेल्या भाविकांच्या कावड यात्रेला रविवारी सकाळी अपघाताचे गालबोट लागले. लाडगाव-वांजरगाव रस्त्यावर भाविकांना घेऊन जाणारा टेम्पो उलटल्याने नऊ भाविक जखमी झाले. त्यापैकी चौघांना गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. औराळा (ता. कन्नड) येथील २० भाविक वांजरगाव येथे पाणी घेण्यासाठी आले होते. तेथून हे पवित्र पाणी घेऊन नाशिक जिल्ह्यातील जातेगाव परिसरातील पिनाकेश्वर महादेवाच्या डोंगरावर जलाभिषेकासाठी जाण्याचे त्यांचे नियोजन होते. अपघातात गौरव विजय खवळे (१७), कृष्णा रतन काळे (१८), आदित्य जयवंत पगारे (१८), कृष्णा अशोक पवार (१८) आणि योगेश साहेबराव झिरवाळ (२६) हे जखमी असून, वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर अमोल खवळे (२४), अविनाश काकडे (२९), कृष्ण खवळे (२०) आणि किरण लेणेकर (२०) यांना गंभीर दुखापत झाल्याने घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले.
Source link
लाडगाव ते वांजरगाव रस्त्यावर कावड यात्रेच्या 20 भाविकांचा टेम्पो उलटला:4 गंभीर जखमी घाटीत, सर्वजण कन्नड तालुक्यातील औराळ्याचे रहिवासी