Headlines

सैनिकांच्या मनगटावर विद्यार्थ्यांची राखी:जम्मू-काश्मीरमधील लष्करी तळावर पाेहाेचल्या राख्या; नांदगावच्या न्यू इंग्लिश स्कूलचा उपक्रम‎




देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठा विद्या प्रसारक समाज संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव येथील विद्यार्थी आणि शिक्षिकांनी स्वहस्ते सुंदर राख्या तयार करून जम्मू-काश्मीरमधील लष्करी तळावर पाठवल्या. रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी सकाळीच या राख्या सैनिकांपर्यंत पोहोचल्याने विद्यार्थ्यांचा हा उपक्रम भावनिक ठरला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा संयुक्त उपक्रम राबविण्यात आला. ‘आपण सण-उत्सव सुरक्षितपणे साजरे करू शकतो, ते केवळ सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या सैनिकांमुळेच,’ असा संदेश देत विद्यार्थ्यांनी सैनिक बांधवांसाठी भावनाप्रधान शुभेच्छापत्रेही तयार केली. काश्मीर खोऱ्यात तैनात असलेल्या सैनिकांना रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळीच राख्या आणि शुभेच्छा संदेश मिळाल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कुटुंबापासून दूर असलेल्या सैनिकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षिका आणि मुख्याध्यापिका ज्योती काळे यांचे आभार मानले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सैनिकांप्रती कृतज्ञता आणि सामाजिक जाणिवेतून बंधुभावाची भावना अधिक दृढ झाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *