Headlines

सटाण्यात मंत्र्यांचा ताफाच अडकला काेंडीत‎:वाहनचालकांसाठी रोजची कोंडी. मात्र व्हीआयपींसाठी काही मिनिटांत मार्ग मोकळा‎




बागलाण तालुका दौरा आटोपून नाशिकच्या दिशेने जात असताना आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या ताफ्याला सटाणा शहरातील रखडलेल्या रस्ता कामाचा फटका बसला. दोधेश्वरनाका ते जिजामाता उद्यान या मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मंत्र्यांच्या ताफ्यालाही वाहतूक कोंडीत अडकावे लागले. परिस्थिती लक्षात घेत पोलिस प्रशासनाने शिवतीर्थाजवळ वाहतूक थांबवली. त्यानंतर मंत्र्यांच्या ताफ्यासाठी विरुद्ध दिशेने मार्ग मोकळा करून देण्यात आला. वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणाऱ्या पोलिसांनाच अखेर मंत्र्यांच्या ताफ्यासाठी नियम बाजूला ठेवून वाट मोकळी करून द्यावी लागल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. वाहनचालकांसाठी रोजची वाहतूक कोंडी. मात्र, व्हीआयपी ताफा आल्यावर काही मिनिटांत वाहतुकीचा ‘व्हीआयपी मार्ग’ मोकळा केला गेल्याचे चित्र दिसून आले. मात्र, सटाणा शहरातील रखडलेल्या रस्ता कामामुळे निर्माण झालेल्या या वाहतूक कोंडीचा कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार, हा प्रश्न मात्र कायम आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *