Headlines

समृद्धीवर वाहनांचे टायर फोडूनलुटणारी टोळी धाराशिवला अटकेत:वळणमार्ग, सीसीटीव्हीच्या कक्षेबाहेरील ठिकाणे शोधून करायचे वाहनचालकांची लूट




समृद्धी महामार्गावर धावत्या वाहनासमोर 26, 27 ऑगस्ट रोजी धारदार लोखंडी वस्तू, जॅक टाकून टायर फोडत प्रवाशांकडील सुमारे 20 लाख रुपये लुटले होते. या प्रकरणात रविवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवून धाराशिव येथे 7 जणांच्या टोळीला अटक करण्यात आली. सोमवारी त्यांना नाशिक पोलिसांच्या ताब्यात दिले. कोर्टाने त्यांना आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. धाराशिव जिल्ह्यातील कळंब व वाशी तालुक्यातील पारधी समाजातील हे सराईत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांनी जळगाव, धाराशिवसह राज्यातील अन्य जिल्ह्यांतील महामार्गांवर प्रवाशांना यापूर्वी लुटले होते. या प्रकरणात या आरोपींना यापूर्वीही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ही टोळी समृद्धीच नव्हे तर राज्यातील विविध महामार्गांवर याच पद्धतीने प्रवाशांना लक्ष्य करत असे पोलिस तपासात समोर आले. धनाजी अर्जुन पवार (22, रा. येरमाळा, ता. कळंब), गोविंद ऊर्फ रामा व्यंकट पवार (50, रा. उमरा), अशोक हिरामण शिंदे (37, रा. खामकरवाडी ता. वाशी), गोविंद शिवाजी पवार (19, रा. लक्ष्मी पेढी, ता. वाशी), अर्जुन व्यंकट पवार (55 रा. येरमाळा), सुनील उर्फ नितीन हिरामण शिंदे (34 रा. खामकरवाडी), लखन भारत काळे (22, रा. खामकरवाडी,ता. वाशी) अशी सात सराईतांची नावे आहेत. मोडस : वाहनासमोर जॅक टाकायचा, वाहन थांबताच लूट महामार्गावर धावत्या वाहनांसमोर अचानक जॅक टाकायचा आणि त्याच्या आसपास दबा धरून बसायचे. भरधाव वाहनाचे चाक जॅकवरून गेल्यानंतर वाहनाचा टायर फुटतो. तसेच प्रसंगी इंजिनही निकामी होत असे. वाहन बंद पडल्यानंतर दबा धरून बसलेले संशयित त्यांना लुटायचे. समृद्धीवरही असेच गुन्हे केले होते. टोळीवर जळगाव-धाराशिवमध्येही गुन्हे समृद्धी महामार्गावरील लुटीच्या घटनेनंतर पकडले गेलेले संशयित पोलिसांसाठी नवीन नाहीत. जळगाव आणि धाराशिव पोलिसांनी यापूर्वीही प्रवाशांना लुटल्याच्या प्रकरणांत या टोळीतील संशयितांना ताब्यात घेतले होते. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील महामार्गांवर लूट केल्याचे गुन्हे त्यांच्या नावावर असल्याची पोलिसांनी सांगितली. अहिल्यानगरात शिजला कट, कॅमेरे नसलेल्या ठिकाणी गुन्हा इतर महामार्गावर वाहनांची संख्या आणि समृद्धी महामार्गावरील अलिशान गाड्यातून फिरणारे प्रवाशी पाहता अहिल्यानगरमध्ये दरोड्याचा कट शिजला असावा, असा पोलिसांचा अदाज आहे. समृद्धी महामार्गावरील वेग कमी होण्याची ठिकाणे आरोपींनी शोधली. वळण मार्ग, सीसीटीव्हीत कक्षेबाहेरील ठिकाण कोणते याची रेकी केली. सहजासहजी पळ काढता यावा. सीसीटीव्हीची नजर ज्या ठिकाणी पडणार नाही. ज्यामुळे प्रवाशांना लुटल्याची माहिती पोलिसांनी कळणार नाही अशी टोळीची पद्धत होती. मोबाइल लोकेशनच्या आधारे अडकले जाळ्यात तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळाच्या जवळपास कार्यरत मोबाइल नंबरची माहिती काढली. त्यानुसार एक- दोन संशयीतांची नावे समोर आली. गावापासून दूर असलेल्या वस्तीवर अंधाराचा फायदा घेत पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या 7 संशयितांना पोलिसांनी शिताफीने अटक केली. साथीदाराच्या बहिणीच्या घरी आले होते दरोडेखोर संशयितांनी दिलेल्या प्राथमिक कबुलीनुसार, गुन्ह्याच्या दोन दिवस आधी संशयित धाराशिव येथून श्रीरामपूर येथे एका साथीदाराच्या बहिणीच्या घरी आले होते. तेथे समृद्धी महामार्गावरील सुरक्षेच्या त्रुटी हेरून दरोड्याचा कट रचला गेला. संशयितांनी आपली वाहने समृद्धी महामार्गावर न नेता महामार्गाच्या खाली रस्त्यालगत अंधारात दडवून ठेवली होती. महामार्गावर पायी जात दोन वाहने लुटल्यानंतर, तिसऱ्या प्रयत्नात नांदेडच्या एका व्यावसायिकाने स्वतःच्या पिस्तुलातून गोळीबार करताच दरोडेखोरांनी पळ काढला होता. ​सायाळे ग्रामपंचायतीचे सीसीटीव्ही ठरले ‘गेम चेंजर’ घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखा व वावी पोलिसांनी शुक्रवारी दिवसभर आणि शनिवारी दुपारपर्यंत घटनास्थळाचा संपूर्ण परिसर पिंजून काढला. तांत्रिक विश्लेषण विभागाला तपासादरम्यान सर्वात महत्त्वाचा दुवा सायाळे (ता. सिन्नर) ग्रामपंचायतीने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे मिळाला. महिलांचे अडथळे झुगारून मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन …. नाशिकचे पोलिस अधीक्षक डॉ. स्वामी यांनी शनिवारी दुपारी तपास पथकाला मार्गदर्शन करत कारवाईचे सूक्ष्म नियोजन आखून दिले. शनिवारी मध्यरात्री धाराशिव येथे दाखल झालेल्या पथकाने तेथील स्थानिक गुन्हे शाखा व कळंब पोलिसांच्या मदतीने पहाटे 2 ते 5 या वेळेत संशयितांच्या वस्तीवर कोम्बिंग ऑपरेशन राबवले. समृद्धीवर 24 तास पेट्रोलिंग समृद्धीवरील लुटमारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने ग्राउंड रिपोर्ट प्रकाशित केला. पोलिस महासंचालक सदानंद दातेंनी संभाजीनगरात बैठक घेतली. समृद्धीवर 24 तास पेट्रोलिंगचे आदेश त्यांनी दिले. सविस्तर. दिव्य सिटी समृद्धीवर वाहन बंद पडल्यास मदतीस विलंब लागतो, हेच हेरून केली या मार्गाची निवड जॅक टाकून लुटीचा प्लॅन समृद्धी महामार्गावर लूट करण्यापूर्वी आरोपींनी घाईघाईने प्लॅन आखला नव्हता. एक दिवस आधीच महामार्गाची रेकी केली होती. वाहनांची वर्दळ, लुटीसाठी योग्य ठिकाण आणि वाहनांना अडथळा निर्माण करण्याची योग्य जागा निश्चित केली होती. त्यानंतर ठरलेल्या स्पॉटवर जॅक टाकून वाहन अडवण्याचा प्लॅन आखण्यात आला. वाहन बंद पडल्यानंतर प्रवासी खाली उतरण्याची शक्यता गृहीत धरून टोळीने पुढील हालचालींचे नियोजन केले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *