Headlines

टाकळीत पावसाअभावी शेतकऱ्याने उपटून फेकली उभी मोसंबीची बाग:यंदा पावसाअभावी विहिरी, बोअरवेल आटले, दुष्काळाचे संकट ‎



यंदा पावसाने पाठ फिरवल्याने हतबल झालेल्या एका शेतकऱ्याने आपली दोन एकरातील मोसंबीची बाग जेसीबीने उपटून फेकल्याची घटना समोर आली आहे. खते-औषधांचा वाढता खर्च, कमी बाजारभाव, त्यात पाण्याअभावी झाडे सुकत असल्यामुळे शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

.

पैठण तालुक्यातील टाकळी येथील संतोष सोलाटे या शेतकऱ्याने मोठ्या आशेने मोसंबीची लागवड केली होती. सुरुवातीची दोन- तीन वर्षे चांगले उत्पादनही मिळाले. मात्र गेल्या दोन वर्षांत मागील वर्षी अतिवृष्टी तर यंदा पावसाअभावी विहिरी, बोअरवेल आटले. पाणी विकत घेऊन बाग जगवण्याचा खर्च परवडेना. पाण्याअभावी झाडे वाळू लागली. फळे गळून पडत होती. या विवंचनेतून बाग उपटण्याशिवाय पर्याय नव्हता, असे शेतकऱ्याने सांगितले. शेतात उपटून टाकलेल्या मोसंबीच्या झाडांचे ढीग पाहून परिसरातील शेतकरीही हळहळ व्यक्त करत आहेत. मराठवाड्यात अनेक ठिकाणी मोसंबी बागायतदारांवर अशीच वेळ आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *