Headlines

श्री पिनाकेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी:संभाजीनगर, नाशिक, जळगाव जिल्ह्यांच्या सीमेवर देवस्थान‎




नांदगाव तालुक्यातील जातेगाव पासुन पाच कि.मी.अतरावर उत्तरेस असलेल्या सह्याद्री पर्वत रांगेतील डोंगर आहे. ह्या डोंगराच्या शिखरावर आहे याशिखरावर पिनाकेश्वर महादेवाचे मंदिर असुन येथे आज पवित्र श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी निमित्ताने हजारो महिलांसह आबालवृद्धांनी दर्शनाचा लाभ घेतला. ह्या पिनाकेश्वर महदेवाच्या दर्शनासाठी मराठवाडा,मध्यमहाराष् ट्रासह खान्देशातील भाविक मोठ्या संख्येने येत असतात, श्रावण महिन्यातील तिसर्या सोमवारी लाखो भाविक अनवाणी पायाने नगर जिल्ह्यातील वांजरगाव येथील सराला बेट पवित्र गोदावरी नदीचे व संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथून अहिल्यादेवी होळकर कुंडातील पाणी आणून जलाभिषेक करतात,त्यात महिलांचीही संख्या लाक्षणिक असते. हे मंदिर संभाजिनगर,जळगाव आणी नाशिक जिल्ह्याची वन विभागाची हद्द असुन नाशिक जिल्ह्याच्या हद्दीमध्ये हे पुरातन शिव मंदिर असुन त्याची शिवपुराण आणी शिवलिलामृत या पवीत्र ग्रंथामध्ये पिनाकेश्वर महादेव या नावाने वर्णन आहे. पुर्वि हे मंदिर साधे मातीमध्ये बांधकाम केलेले होते, व मंदिरा समोर दीपमाळ आणी चार पिण्याच्या पाण्याचे कुंड आहे . ह्या मंदिराचा जिर्णोध्दार संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांनी सन 1964 मध्ये हेमाडपंती पध्दतीने बांधकाम करुन पूर्ण केला. जिर्णोद्धारसाठी जातेगाव व पंचक्रोशीतील नागरिकांनी स्वयंमस्पुर्तीने विनामोबदला काम केले तसेच लोकवर्गणी देखील दिली. तेव्हा पासुन श्री पिनाकेश्वर महादेव मंदिर चंदनपुरी जातेगाव या नावाने येथील देवस्थानाची ट्रस्ट आहे. या देवस्थानास चैत्र नवमीस भरणाऱ्या वार्षिक यात्रा, श्रावण महिनाभर असणारा उत्सव व महाशिवरात्रीसह सर्व धार्मिक उत्सवास येणाऱ्या भाविकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मोफत आरोग्य व्यवस्था महिला व पुरुषांसाठी दर्शन व्यवस्था ईत्यादी सुविधा ट्रस्टच्या वतीने करण्यात येतात. आजही मोठ्या पहाट पासुन सायंकाळी उशिरा पर्यंत भाविक येथे दर्शन घेण्यासाठी येतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *