Headlines

सरासरीच्या 66.2 टक्केच पाऊस; जिल्ह्यात 202.30 मिमी.ची तूट:15 दिवसांपासून दडी; बळीराजा चिंताग्रस्त, व्यापाराला फटका‎




जिल्ह्यात १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यावर अवर्षणाचे सावट गडद झाले. दहा वर्षाचे आकडे पाहिले तर १८ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ५९८ मिमी पाऊस पडायला हवा होता. प्रत्यक्षात मात्र तो २०२.३० मिमीने कमी असून, ३९५.७० मिमीवरच थांबला आहे. वाढीच्या काळातच पावसाने ताण दिल्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर ही मुख्य पिके सुकत आहेत. पावसाच्या लहरीपणाचा फटका शेतीसह ग्रामीण, शहरी अर्थचक्रालाही बसला आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या होत्या. मात्र, दोन आठवड्यांपासून ऊन, हवेतील उष्णता वाढल्याने पिकांची वाढ खुंटली. जमिनीतील ओलावा संपल्यामुळे पिके पिवळी पडत आहेत. विहिरी, बोअरवेलची पाणीपातळीही खालावल्याने पिकांना वाचवायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. आणखी काही दिवस पाऊस न आल्यास हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती व्यक्त होत आहे. शेतीवर आधारित जिल्ह्यातील बाजारपेठांमध्येही या पावसाच्या खंडाचा परिणाम दिसून येत आहे. खते, कीटकनाशके, शेती उपकरणांची मागणी थांबल्याने कृषी सेवा केंद्रांचे व्यवहारही ठप्प झाले कृषी विभागाच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर पिकांचे अतोनात नुकसान होऊ शकते. पावसाच्या या प्रदीर्घ दांडीमुळे जिल्ह्याचे आर्थिक गणित कोलमडले असून, आता सर्वांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण कुमार यांच्या मते जिल्ह्यासह विदर्भात सध्या पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर कमी राहील. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या सूचनेनुसार विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र, मोठ्या पावसासाठी आवश्यक असलेली हवामान प्रणाली सध्या विदर्भाच्या आसपास सक्रिय नसल्याने मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे. उत्पन्नाची अनिश्चितता निर्माण झाल्यामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील ग्राहकांनी काही बाबींवरील खर्च टाळण्यास सुरुवात केली आहे. कापड बाजार, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल्स आणि दैनंदिन वस्तूंच्या विक्रीतही काही प्रमाणात घसरण झाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री करणाऱ्या एका दुकानदाराच्या मते गेल्या पंधरवड्यात सुमारे ३० टक्क्यांपर्यंत विक्री घटली आहे. अमरावती जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस अचलपूर तालुक्यात झाला. या तालुक्यात आजपर्यंत सरासरी ५६८.५ मिलिमीटर पाऊस पडायचा. यावर्षी केवळ २९२.३ (५१.४ टक्के) पाऊस नोंदला गेला. कमी पावसाच्या क्षेत्रात दुसरा क्रमांक चिखलदरा तालुक्याचा आहे. तेथे ९४९.८ मिलिमीटर पाऊस हवा असताना ५२२.९ मिलिमीटरच (५५.१ टक्के) पाऊस पडला, तर वरुड तालुक्यात ५५२.५ मिलिमीटर पावसाची अपेक्षा असताना केवळ ३१७.१ मिलिमीटर (५७.४ टक्के) पाऊसच नोंदला गेला. वस्तू विक्रीत ३० टक्के घट



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *