Headlines

मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त:खासदार बळवंत वानखडे यांनी घेतली रुग्णालयात भेट, दोषींवर कारवाईचे दिले निर्देश‎




येथील महर्षी पब्लिक स्कूलमधील पाच विद्यार्थ्यांना उलट्या, जुलाब, चक्करसारखी लक्षणे जाणवल्याने त्यांना येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधाच झाल्याचा संशय खासदार बळवंतराव वानखडे यांनीही व्यक्त केला असून, बुधवारी रुग्णालयात पोहोचून त्यांनी संबंधित विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्याचवेळी या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. भेटीदरम्यान खासदार वानखडेंनी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची डॉक्टरांकडून माहिती घेतली. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पाचही विद्यार्थ्यांची प्रकृती स्थीर असल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांच्या उपचारामध्ये कमतरता राहू नये आणि त्यांच्या प्रकृतीवर योग्य लक्ष ठेवावे, अशा सूचना खासदार वानखडे यांनी दिल्या. त्याचवेळी या प्रकरणाची निःष्पक्ष आणि सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांच्या प्रकृती बिघडण्यामागील नेमके कारण समोर आणावे, दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदार वानखडे यांनी केली. या घटनेमुळे निवासी व शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या भोजनाची गुणवत्ता, स्वच्छता, आरोग्य सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनाच्या चौकशीतून वस्तुस्थिती समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे प्रशासनावर पाठराखणचा आरोप दरम्यान, या प्रकरणावरून खासदार बळवंत वानखडे यांनी महर्षी पब्लिक स्कूलच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. संस्थाचालकांना सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून पाठीशी घातले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *