Headlines

कुरुल चौकात सांडपाण्यामुळे दुर्गंधी; नागरिकांना नाहक त्रास:विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका, डासही वाढले‎




मोहोळ तालुक्यातील कुरुल येथील पंढरपूर,मोहोळ,सोलापू र याकडे जाणाऱ्या संपूर्ण वाहनांची रहदारी असणाऱ्या चौकात बँक, ग्रामपंचायत कार्यालयासह इतर ठिकाणावरून सांडपाण्यासह पावसाच्या पाण्यामुळे मेन चौकात पडलेल्या खड्ड्यामध्ये पाणी साचत असल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांच्या जीवितेच धोका निर्माण झाला आहे. मोहोळ-पंढरपूर-सोलापू र मार्गे जाणाऱ्या वाहनांसह शेजारील गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी तर नागरिक किराणा बाजारासह आठवडा बाजारासाठी कुरुल येथे मोठ्या प्रमाणात येत आहेत.कुरुल हे तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येसह मतदार असणारे गाव आहे.अशा या ठिकाणी किरकोळ पाऊस जरी पडला तरी सदर खड्ड्यांमध्ये सर्व ठिकाणावरून वाहत पाणी येत असल्याने तो खड्डा पावसाळ्यासह इतर वेळेस देखील पाण्याने भरलेला राहत आहे. त्यामुळे सदर ठिकाणी डासांच्या प्रमाणासह सदर रस्त्यावरून न्यू इंग्लिश स्कूल सह प्राथमिक शाळेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ये-जा करीत आहेत. समोरून वाहन आल्याने विद्यार्थ्यास अंदाज न आल्याने अनेकदा सदर पाण्यामध्ये विद्यार्थी पडून अपघात झाले आहेत. मात्र सदर ठिकाणी ग्रामपंचायतीसह रस्ता कॉन्टॅक्ट दाराचे दुर्लक्ष होत आहे.सदर ठिकाणी खड्डा बुजून विद्यार्थ्यासह नागरिकांना दिलासा द्यावा अशी नागरिकांमधून मागणी होत आहे. अनेक दिवसांपासून त्रास सहन करतोय मागील अनेक वर्षापासून सदर ठिकाणी बँकेसह ग्रामपंचायत कार्यालयापासून पडलेल्या पावसाचे पाणी येऊन साचत आहे. त्याचबरोबर सदर ठिकाणी स्पीड बेकर केल्याने अधिकच पाणी साचत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्वरित सदर ठिकाणी दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा. सीताराम जाधव, नागरिक, कुरुल



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *