Headlines

वैरागच्या यात्रेत यंदा घुंगराचा आवाज नाही; समाजोपयोगी कार्यक्रमांवर भर:संतनाथ महाराज यात्रेनिमित्त वैराग पोलिस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक‎



येथील पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेली श्री संतनाथ महाराज यांची यात्रा दि. २३ ते २८ ऑगस्टपर्यंत आहे .यात्रेच्या पार्श्वभूमीवर वैराग पोलिस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटीची बैठक बुधवारी रात्री सात वाजता संपन्न झाली. यामध्ये यात्रेमधील नियोजनाविषयी चर्चा झाली.

.

या बैठकीमध्ये श्री संतनाथ महाराज देवस्थान समितीचे प्रमुख ,तसेच भंडारा कमिटी, यात्रेतील प्रमुख प्रतापराव निंबाळकर हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. पालखी मार्गावरील रस्त्याची दुरुस्ती करणे , महिला व पुरुषांसाठी सार्वजनिक शौचालय स्वच्छ करणे ,यात्रा काळात स्वच्छ पाणीपुरवठा, नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पथक नेमणे, दहिहंडी वेळेवर फुटावी यासाठी लेझीम संघ प्रमुखानी दक्षता घेणे, आदि विषयावर निर्णय घेण्यात आला .मात्र तरुणांच्या जिवाळ्याचा असणारा नार्तकीच्या ताफ्यांचा मुद्दा मात्र बाजूला पडल्याने बैठकीस उपस्थित असलेल्या काही नागरिकांमध्ये नाराजी दिसून आली.

या वेळी संतनाथ महाराज देवस्थान समीतीचे स्वर्गीय अध्यक्ष रावसाहेब पाटील, यांना प्रथम श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी उपसभापती संतोष निंबाळकर, उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर, पोलिस उपनिरीक्षक विक्रम वडणे ,प्रतापसिंह जाधव राजाभाऊ निंबाळकर, मोहन घोडके संतोष गणेचारी, नगरसेवक शाहूराजे निंबाळकर, प्राथमिक आरोग्य विभागाचे अधिकारी, नगरपंचायतीचे अधिकारी, तसेच महावितरणचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यात्रेतील गर्दीचे नियोजन, वाहतूक व्यवस्था तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र, नर्तकींच्या ताफ्यांना परवानगी नाकारण्यात आल्याने यात्रेतील मनोरंजनाचा एक भाग यंदा पाहायला मिळणार नसल्याने तरुण वर्गासह काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच या निर्णयाबाबत वैराग येथील सुज्ञ नागरिकांकडून निर्णयाचे स्वागत करण्यात आल्याचे दिसून आले.

संतनाथ लेझीम संघाचा करणार सन्मान गतवर्षी पार पडलेल्या लेझीम स्पर्धेचे प्रथम विजेतेपद संतनाथ तालीम संघ यांना सन्मानचिन्ह देण्यात आले. तर द्वितीय पारितोषिक दयावान लेझीम संघ यांना देण्यात आले तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक शिवशक्ती लेझीम संघाला वैराग पोलिस स्टेशनच्या वतीने देण्यात आले. त्याचे वितरण होणार आहे.

उल्लंघन केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल होणार ^यावर्षी नर्तकी नाचावण्याच्या ताफ्याना बंदी असल्यामुळे अनेकांचा हिरमुड झाला . असला तरी पोलिसांची संतनाथ यात्रा काळात छम छमला परवानगी सपशेल नाकारले आहे. कायद्याचं उल्लंघन केले तर आम्ही गुन्हा दाखल करू. कायद्याचे उल्लंघन केले नाही तर गुन्हा दाखल करू. अमूल कादबाणे , पोलिस निरीक्षक



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *