Headlines

साडेतीन महिन्यानंतर 6.5 तोळे सोने हस्तगत:बसमध्ये चढताना डल्ला मारणारी महिला अटक, दोन गुन्ह्यांचा करमाळा पोलिसांनी लावला छडा, संशयित चोरटी संभाजीनगरमधील‎



नातेवाइकांचा विवाह सोहळा उरकून करमाळ्याहून अंकोली (ता. मोहोळ) येथे जाण्यासाठी एसटी बसमध्ये चढताना एका महिलेच्या पर्समधून साडेसहा तोळ्यांचे दागिने चोरीला गेल्याची घटना ३० एप्रिलमध्ये घडली होती. या गुन्ह्याचा तपास करत करमाळा पोलिसांनी तब्बल साडेतीन महि

.

याबाबत हकीकत अशी की, दि. ३० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास फिर्यादी स्वाती धनंजय पुजारी (रा.अंकोली ता. मोहोळ) या करमाळा सोलापूर बसने प्रवासासाठी निघाल्या होत्या. बसमध्ये चढल्यानंतर काही वेळाने त्यांनी पर्स तपासली असता पर्सची चैन उघडी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पर्समधील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी करमाळा पोलिसांत तक्रार दिली. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये २५ ग्रॅमचा सोन्याचा राणीहार, २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मोठे गंठण , १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा चोकर आणि ५ ग्रॅम वजनाचे कानातील झुबे-टॉप असे एकूण १० लाख ५ हजार रुपयांचे सोने दागिन्यांचा समावेश होता.ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे व उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रणजित माने यांच्या पथकातील अभिजित मोहोळकर, ईसामिया करमाळा शहरातील कसाब गल्ली येथे घराबाहेर लावलेली मोटारसायकल दि. ४ ऑगस्ट रोजी चोरीला गेली होती. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सुमारे ६५ हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच १६ झेड ९९४०) रावसाहेब उर्फ पप्पू पांडुरंग चव्हाण (रा. सावडी, ता. करमाळा) याच्याकडून हस्तगत केली. चोरीची मोटारसायकल सावडी गावातील पुलाजवळ लपवून ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी दुचाकी जप्त करून त्याला अटक केली आहे.

सीसीटीव्हीवरुन चोर हाती



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *