Headlines

सायबर भामट्यांचा गेम ओव्हर:फसवणूक रोखण्यासाठी आता ‘डिजिटल नाकेबंदी’, हायटेक यंत्रणेद्वारे रिअल टाईम ट्रॅकिंग




सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि ऑॅनलाईन आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी राज्यात आता डिजिटल नाकेबंदी सुरू करण्यात आली आहे. गृह विभागाच्या आदेशाने सर्व सायबर पोलिस ठाण्यात ही कार्यवाही सुरू झाली आहे. या अत्याधुनिक मोहिमेंंतर्गत संशयित व्यवहार, बनावट काॅल आणि अार्थिक फसवणुकीचे केंद्र ठरणाऱ्या खात्यांना रिअल टाईम रोखले जाईल. खाते फ्रिज, सिम ब्लाॅक, अन् रिअल टाईम ट्रॅकिंग हे सायबर पोलिसांना हायटेक प्लॅनिंग अंमलात येणार आहे. अशी केली जाईल ‌डिजिटल नाकेबंदी, १० मिनिटांत कारवाई १९३० या सायबर हेल्पलाईनवर तक्रार नोंदवताच १० मिनिटांत ज्या खात्यात रक्कम जमा झाली ते खाते फ्रिझ केले जाईल. बनावट कागदपत्रांवर घेतलेली हजारो संशयित सिम कार्ड थेट डी अॅक्टिव्हेट केले जातील. ज्या भागातून सर्वाधिक सायबर काॅल येतात, त्या मोबाईल टाॅवर अाणि लोकेशनवर डिजिटल नजर ठेवली जाईल. एअायच्या माध्यमातून संशयित व्यवहारांचा सुगावा लावण्यासाठी सिस्टिमचा वापर केला जाईल. टास्क फ्राॅड, वर्क फ्राॅम होम, डिजिटल अरेस्ट, शेअर्स ट्रेडींग अाणि अन्य डिजिटल स्कॅमच्या गुन्ह्यांत ही नाकेबंदी प्रभावी ठरणार अाहे. नागरिकांनी ही घ्यावी खबरदारी फसवणूक झाल्यास १५ मिनिटांत १९३० वर तक्रार करा. बँक अधिकारी, पोलिस कोणीही फोनवर पासवर्ड मागत नाही. डिजिटील अरेस्टमध्ये सरकारी संस्था अथवा पोलिस व्हिडीअो काॅलवरुन अटक करत नाही. अशा काॅलला प्रतिसाद देऊ नका, घाबरून न जाता इंटरनेट बंद करा. सायबर पोलिसांत तक्रार करा. जलद पोहाेचणे शक्य होणार सायबर हॅकर नवीन क्लृप्त्या शोधत अाहेत. डिजिटल नाकेबंदीमुळे या गुन्हेगारांपर्यंत जलद पोहचणे पोलिसांना शक्य होईल.नागरिकांचे पैसे वाचवणे हे अामचे उद्दिष्ट अाहे. – संदीप मिटके, सहाय्यक अायुक्त, गुन्हे



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *