![]()
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्या निर्घृण हत्येचा धक्का अद्याप पचलेला नसतानाच, आता त्यांचे पुत्र आणि आमदार झिशान सिद्दीकी यांच्यावरही मोठ्या संकटाची छाया पसरली आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य फरार सूत्रधार झिशान अख्तर याने थेट परदेशातून एक ‘व्हॉइस नोट’ पाठवून झिशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची थेट धमकी दिली आहे. या धक्कादायक घटनेमुळे मुंबई राजकीय वर्तुळात आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. “वडिलांच्या वेळी नशिबाने वाचलास, आता सोडणार नाही!” – धमकीचा थरारक मजकूर परदेशात दडून बसलेल्या गँगस्टरने पाठवलेल्या या ऑडिओ मेसेजमध्ये अत्यंत चिथावणीखोर आणि आक्रमक भाषा वापरण्यात आली आहे. धमकी देताना आरोपीने म्हटले आहे की, “तुझ्या बापाचा काटा मीच काढला होता, आता तुझा नंबर आहे. तू माझ्या प्रत्येक कारभारात मध्ये मध्ये करत आहेस. तुला क्राईम ब्रांचकडे जेवढ्या फेऱ्या मारायच्या आहेत तेवढ्या मार, तुझ्याविरोधात फतवाच जारी केलाय. वडिलांच्या हत्येवेळी तू नशिबाने वाचलास, पण या वेळी तुझा गेम निश्चित आहे!” सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर, डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू झिशान सिद्दीकी यांना आलेल्या गंभीर धमकीनंतर मुंबई पोलिसांची यंत्रणा तातडीने सक्रीय झाली आहे. आमदार झिशान सिद्दीकी यांच्या सुरक्षेत तातडीने वाढ करण्यात आली असून त्यांच्या संरक्षणासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. परदेशातून आलेल्या त्या ‘व्हॉइस नोट’ची सत्यता पडताळण्यासाठी ती डिजिटल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आली आहे. झिशान अख्तर हा आंतरराष्ट्रीय स्तरावरून आपली गुन्हेगारी टोळी चालवत असल्याचे स्पष्ट झाले असून, पोलीस त्याचा माग काढत आहेत. पार्श्वभूमी: 12 ऑक्टोबरचा तो काळरात्र 12 ऑक्टोबर 2024 रोजी वांद्रे (पूर्व) येथे आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेरच राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) वरिष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. बॉलीवूड अभिनेता सलमान खानशी असलेली मैत्री आणि गुन्हेगारी जगतातील वर्चस्वाच्या संघर्षातून ही हत्या झाल्याचे तपासात उघड झाले होते. या प्रकरणाचा तपास करताना मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 27 जणांविरुद्ध कठोर ‘मकोका’ (MCOCA) कायद्यांतर्गत दोषारोपपत्र दाखल केले आहे. मात्र, मुख्य सूत्रधार परदेशात बसून पुन्हा एकदा सिद्दीकी कुटुंबाला लक्ष्य करत असल्याने मुंबईत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Source link
सिद्दीकी कुटुंबावर पुन्हा गँगस्टरचे सावट!:बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर आता झिशान सिद्दीकींना परदेशातून 'व्हॉइस नोट'द्वारे थेट जीवे मारण्याची धमकी