Headlines

सिद्धीताईंच्या कीर्तनाने अजिंठ्यात भक्तीचा जागर:व्यसनमुक्ती, संस्कार या मूल्यांवर टाकला प्रकाश‎




अल्पवयातच वडिलांचे छत्र हरपले, मात्र त्याच दुःखाला भक्तीची आणि समाजप्रबोधनाची शक्ती बनवत ह.भ. प. सिद्धीताई संजय सनान्से यांनी सादर केलेल्या भावस्पर्शी कीर्तनाने अजिंठा नगरीतील भाविकांची मने जिंकली. संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून भक्तीबरोबरच संस्कार, व्यसनमुक्ती, आई-वडिलांची सेवा आणि सामाजिक जाणिवेचा संदेश देत त्यांनी उपस्थितांना अंतर्मुख केले. सिद्धीताईंनी आपल्या कीर्तनातून संत तुकाराम महाराजांचा “आपुला तो एक देव करुनी घ्यावा । तेणेविण जिवा सुख नोव्हे ।।” हा अभंग अत्यंत सुंदर पद्धतीने उलगडून सांगितला. भक्तीबरोबरच व्यसनमुक्ती, मांसाहाराचा त्याग, नैतिकता, संस्कार, पर्यावरण संवर्धन तसेच आई-वडिलांची वार्धक्यात सेवा या जीवनमूल्यांवर त्यांनी प्रभावीपणे भाष्य केले. अल्पवयात सामाजिक आणि नैतिक विषयांवर त्यांनी केलेले प्रबोधन उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरले. बाल टाळकरीने जिंकली मने बाल टाळकरी मुलीने सादर केलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आजी सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा घनु ।। हरी पाहिला रे… हरी पाहिला…या अभंगाने वातावरणात आणखी भक्तिमय रंग भरला. तिच्या गोड, निरागस आणि भावपूर्ण गायनाला उपस्थित भाविकांनी उत्स्फूर्त दाद दिली. उत्सवाला संस्कारांची जोड क्रांतिवीर गणेश मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून गणेशोत्सवाला केवळ मनोरंजनाचे स्वरूप न देता भक्ती, संतविचार, संस्कार आणि सामाजिक प्रबोधनाची जोड देण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमाबद्दल मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे उपस्थित भाविकांकडून कौतुक करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *