![]()
सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील केमिस्ट बांधवांनी विविध मागण्यांसाठी बुधवारी एकदिवसीय बंद पाळत वावी पोलिस ठाण्यात निवेदन दिले. ऑनलाईन औषध विक्री, बनावट औषधांचा वाढता धोका तसेच विनाप्रिस्क्रिप्शन औषध विक्रीवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तालुक्यातील सर्वच मेडिकल दुकाने दिवसभर बंद ठेवल्याने नागरिकांना औषधे मिळविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला. हा बंद केवळ केमिस्ट व्यवसायाच्या संरक्षणासाठी नसून, रुग्ण सुरक्षा, सुरक्षित औषध वितरण व्यवस्था आणि पारंपरिक मेडिकल व्यवसायाच्या अस्तित्वासाठी असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. विनाप्रिस्क्रिप्शन गर्भपाताची, नशेची तसेच इतर धोकादायक औषधे सहज उपलब्ध होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला. तसेच ऑनलाईन औषध विक्रीमुळे डुप्लिकेट औषधांचा धोका वाढत असून त्यावर नियंत्रण आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. यावेळी सिराज कादरी, संतोष मालपाणी, संतोष विधाते, प्रकाश गोडगे, प्रकाश शेंडगे आदींची यावेळी उपस्थिती होती.
Source link
सिन्नरला पूर्व भागातील केमिस्टांचा एकदिवसीय बंद:ऑनलाईन औषध विक्रेत्यांवर कारवाईची मागणी