![]()
तालुक्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्यात आहे. मंत्री मात्र पन्नास गाड्यांच्या ताफ्यात. असे विदारक चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे? असा संतप्त प्रश्न माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी विचारला आहे. शिवसेनेच्या वतीने कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावर त्यांनी टिका केली. प्रतिनिधी | कन्नड कन्नड तालुक्यात सातशे एकरांवर एमआयडीसीला मान्यता देण्यात आली आहे. मात्र, काही शेतकऱ्यांनी जमीन संपादनास विरोध दर्शविला आहे. शेतकऱ्यांनी संमती दिली तर एमआयडीसी कार्यान्वित करू. अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी (२२ मे) शिवसेना विधानसभा कार्यकर्ते मेळाव्यात दिली. गजानन हेरिटेज येथे कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. ते म्हणाले की, पक्षनेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विकासाभिमुख कामे करत आहेत. आमदार संजना जाधव यांच्या अनुपस्थितीत तालुक्यात एवढा मोठा प्रतिसाद मिळाला. यावरून तालुक्यात पक्षाचे काम व्यवस्थित सुरू आहे हे लक्षात येते. पक्ष संघटना मजबूत करा. शिवसेना पक्ष तळातील कार्यकर्त्यांना पाठबळ देईल. तालुक्यात सातशे एकरांवर एमआयडीसीला मान्यता दिली आहे. मात्र, शेतकऱ्यांचा विरोध आहे. कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांची संमती मिळवावी. प्रास्ताविक ज्ञानेश्वर निकम यांनी केले. ते म्हणाले की, आमदार संजना जाधव यांच्या नेतृत्वाखाली पक्षसंघटना बळकट झाली आहे. त्यामुळे पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थेतही मोठे यश मिळाले आहे. या वेळी खासदार संदिपान भुमरे म्हणाले की, केंद्राशी भांडून कन्नड घाटातील अडीच हजार कोटी रुपयांचा साडेपाच किलोमीटर अंतराचा भुयारी मार्ग मंजूर केला आहे. त्याचे टेंडरही झाले आहे. लवकरच या कामाला सुरुवात होईल. माजी खासदार राहुल शेवाळे आपल्या भाषणात म्हणाले की, पक्षामध्ये बूथ प्रमुखाला मोठे महत्त्व आहे. मंचावर आमदार रमेश बोरनारे, बाजार समितीचे सभापती डॉ. मनोज राठोड, नगरसेवक प्रकाश अग्रवाल, माजी आमदार अण्णासाहेब माने, विलास पारकर, प्रकाश महाजन, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, राजेंद्र राठोड यांची उपस्थिती होती. याप्रसंगी जयेश बोरसे, आकाश बोलधणे, गोकुळ राठोड, भगवान कांदे, साईनाथ आल्हाड, आदित्य गर्जे, रवी जाधव, जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पवार, सिद्धेश्वर झाल्टे, रत्नाकर पंडित,अरविंद राठोड, पुष्पा गव्हाणे, सोनाली धाटबळे, आदींसह मोठ्या संख्येने कन्नड सोयगाव मतदारसंघातील कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
Source link
कन्नडला सातशे एकरांवरील एमआयडीसी मंजूर- सामंत:कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना कार्यकर्ता मेळावा, आमदारांची अनुपस्थिती