Headlines

सिलिंडरसाठी वणवण; लासलगावला आंदोलन:शहर विकास समितीकडून ढाेल -ताशा बजाव




ऐन सणासुदीच्या काळात ऑनलाइन बुकिंग करूनही १५ ते २० दिवस सिलिंडर मिळत नसल्याने जाधव गॅस एजन्सीच्या कारभाराविरोधात लासलगाव शहर विकास समितीच्या वतीने ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. घरगुती गॅसच्या विस्कळीत वितरणामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, एजन्सीच्या कारभारात तातडीने सुधारणा करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. ऑनलाइन नोंदणी करूनही वेळेत सिलिंडरचे वितरण होत नसल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून केल्या जात आहेत. काही ग्राहकांनी ऑनलाइन पेमेंट करूनही सिलिंडर मिळत नसल्याचे सांगितले. एजन्सीकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने ग्राहकांना वारंवार पाठपुरावा करावा लागत आहे. सणासुदीच्या काळात पर्यायी वितरण व्यवस्थेचे नियोजन करण्यात प्रशासन आणि संबंधित यंत्रणा अपयशी ठरल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. लासलगाव शहरासह परिसरातील ग्राहकांची गैरसोय दूर करून घरपोच सिलिंडर वितरण तातडीने सुरळीत करावे, अशी मागणी शहर विकास समितीने केली. बुधवार, दि. २८ ऑक्टोबरपर्यंत सिलिंडर घरपोच मिळाले नाहीत, तर महिलांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही समितीने दिला. यावेळी प्रकाश पाटील, राजेंद्र कराड, संदीप उगले, प्रमोद पाटील, धर्मेश जाधव, चंद्रकांत नेटारे, शेखर कुलकर्णी यांच्यासह त्रस्त गॅस ग्राहक उपस्थित होते. गॅस सिलिंडरच्या विलंबित वितरणामुळे गृहिणींचे स्वयंपाकाचे नियोजन कोलमडले आहे. ग्राहकांना वारंवार एजन्सीकडे पाठपुरावा करावा लागत असल्याने घरपोच सेवा तातडीने सुरळीत करण्याची मागणी होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *