Headlines

सिल्लोड शहरात अपुऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांमुळे गुन्हेगारीत वाढ:सिल्लोड शहर पोलिस स्टेशनला 51 कर्मचारी व 5 अधिकारी अशी मंजूर संख्या‎



सिल्लोड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असली तरी पोलिसांची संख्या मात्र २५ वर्षांपूर्वी जी होती तीच असल्याने अपुऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर शहराच्या सुरक्षेचा भार पडत असून यामुळे सिल्लोड शहरात गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

.

२०११ च्या जनगणनेनुसार सिल्लोड शहराची ५८ हजार लोकसंख्या आहे. परंतु आजच्या परिस्थितीत सिल्लोड शहराची लोकसंख्या ८० हजारांच्या आसपास असल्याचे चित्र आहे. या लोकसंख्येसाठी सध्या सिल्लोड शहर पोलिस स्टेशनला ५१ कर्मचारी व ५ अधिकारी अशी मंजूर संख्या आहे. यापैकी सध्या शहर पोलिस ठाण्यात ३९ कर्मचारी व ४ अधिकारी कार्यरत आहेत. याशिवाय या कार्यरत कर्मचाऱ्यांमधील पाच पोलिस कर्मचारी हे उपविभागीय अधिकारी कार्यालयाशी संलग्न असून दोन चालक,एक ट्रेझरी,एक टपाल ने-आण, एक अंगरक्षक असे दहा ते बारा कर्मचारी इतरत्र कार्यरत असल्याने सिल्लोड शहराच्या नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी या शहर पोलीस पाण्याच्या केवळ २० कर्मचारी व चार अधिकाऱ्यावर असल्याने नागरिकांची सुरक्षा धोक्यात आलेली आहे. शहर पोलिस ठाण्यात मागील महिन्यात नवीन अधिकारी रुजू होताच चोरट्यांनी शहरातील दोन वस्त्यांमध्ये चोरी करून पोलिसांना खुले आव्हान दिले होते.सतत चार दिवस संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी दिवस-रात्र शोध घेऊन एका आरोपीस अटक केली आहे.

शहरातील मुख्य रस्त्यासह काही महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले असले तरी गुन्हेगारांना पोलिसांचा वचक राहिलेला दिसत नाही. शहरातील अनेक भागात छोट्या-मोठ्या चोरीच्या घटना घडतच आहेत. शिवाय दररोज मुख्य रस्ता व वसाहतीत जाणाऱ्या रस्त्यांवर बेशिस्त वाहनधारकांची मोठी गर्दी दिसून येते. या वाहनधारकांवर कारवाई करण्यासाठी पुरेसे पोलिस बळ नसल्याने नागरिकांनाच आपला जीव मुठीत घेऊन रस्त्याने चालावे लागत आहे. झपाट्याने वाढत असलेल्या सिल्लोड शहरालगत अनेक नवीन वसाहती तयार होत आहेत या वसाहतींमध्ये कोणते व्यवसाय चालतात याकडेही पोलिसांचे लक्ष नसल्याने दिवसेंदिवस शहरात गुन्हेगारी वाढत आहे.

शहरात १०० पोलिस कर्मचाऱ्यांची आवश्यकता आम्हाला सिल्लोड शहरासाठी १०० पोलिस कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. याबाबत वरिष्ठ कार्यालयास कळवले असून अधिकच्या कर्मचारी संख्येची मागणी करण्यात आली आहे. शहर वाहतूक कोंडीबाबत आम्ही नगर परिषदेशी संपर्क करून रस्त्यावर पांढरे पट्टे काढणार असून त्यानंतरही वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल करू. – श्यामसुंदर कौठाळे, पोलिस निरीक्षक



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *