Headlines

सुनील तटकरे आमच्यासोबत दगाफटका करू शकतात:अनिकेत तटकरे आणि भरत गोगावलेंच्या भेटीनंतर महेंद्र दळवींची टीका




कोकण विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नवनिर्वाचित आमदार अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर अनिकेत तटकरे यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री भरत गोगावले यांची मुंबई येथील ‘सुरूची’ या सरकारी निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तसेच आता शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच सुनील तटकरे आमच्यासोबत भविशेत दगाफटका अकरू शकतात अशी भीती देखील दळवी यांनी बोलून दाखवली आहे. महेंद्र दळवी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले की, अनिकेत तटकरे हे विधानपरिषदेवर निवडून गेले आहेत. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने आपल्या वरिष्ठांना आणि मंत्र्यांना भेटणे हे त्यांचे कामच आहे. त्यामुळे मी अनिकेत तटकरे यांचे स्वागत करेन. तटकरे कुटुंबाशी माझा कोणताही वैयक्तिक किंवा कौटुंबिक वाद नाही. मात्र, खासदार सुनील तटकरे यांच्या राजकीय प्रवासातील उलटफेर आणि त्यांच्या राजकीय धोरणांना माझा आज, उद्या आणि भविष्यातही कायम तीव्र विरोध राहील. रायगडच्या राजकारणात अत्यंत संवेदनशील ठरलेल्या पालकमंत्री पदावरून बोलताना महेंद्र दळवी म्हणाले, सुनील तटकरे हे सध्या पालकमंत्री पदाच्या विषयावर घुमजाव करत आहेत. मुळात पालकमंत्रिपद आणि विधानपरिषद जागा हा एकमेकांशी बर्गेनिंग करण्याचा विषयच नाही. परंतु, तटकरेंनी या दोन्ही गोष्टींचा वापर करून बर्गेनिंग करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप दळवी यांनी तटकरे यांच्यावर केला आहे. सुनील तटकरे आमच्यासोबत दगाफटका करू शकतात तसेच सुनील तटकरे हे महायुतीत असले तरी येणाऱ्या काळात आमच्यासोबत दगाफटका करू शकतात, अशी भीती महेंद्र दळवी यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, आता काहीही झाले तरी रायगडचे पालकमंत्रिपद हे भरत गोगावले यांच्या रूपाने रायगडकरांनाच मिळेल, असा विश्वासही दळवी यांनी बोलून दाखवला आहे. दरम्यान, महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यावर जरी टीका करत आरोप केले असले तरी त्यांची स्वपक्षातील वरिष्ठ नेत्यांवरही नाराजी असल्याचे समोर आले आहे. महायुतीमध्ये रायगड जिल्ह्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना तसेच नेत्यांना डावलले जात असल्याची भावना दळवी यांनी त्यांच्या बोलण्यातून व्यक्त केली आहे. अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे शिवसेना शिंदे गटात देखील अंतर्गत वाद निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *