Headlines

सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या संगीत सोहळ्यात किंग खानची हजेरी:'कोई मिल गया' गाण्यावर धरला ठेका! VIDEO व्हायरल




राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांची नात व खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे व सारंग लखानी यांच्या विवाहाची सध्या लगबग सुरू असून, त्यांच्या विवाहसोहळ्याचे काही फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. यात शुक्रवारी पार पडलेल्या त्यांच्या भव्य संगीत सोहळ्याचा एक खास व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बॉलिवूडचा ‘बादशाह’ शाहरुख खान याने विशेष हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये शाहरुख खान, नवरदेव सारंग लखानी आणि सुप्रिया सुळे एकत्र दिसत असून, या संगीत सोहळ्यातील शाहरुखच्या उपस्थितीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये, बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान काळ्या रंगाच्या आकर्षक आऊटफिटमध्ये रेवती सुळे व सारंग लखानी यांच्या संगीत सोहळ्यात सहभागी झालेला दिसत असून, तो 1998 मधील त्याच्या ‘कुछ कुछ होता है’ या गाजलेल्या चित्रपटातील ‘कोई मिल गया’ या गाण्यावर रेवती आणि इतर पाहुण्यांसोबत डान्स करताना दिसत आहे. तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये तो त्याची प्रसिद्ध आणि आयकॉनिक ‘सिग्नेचर पोज’ देताना पाहायला मिळत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे ही नागपूरचे प्रसिद्ध उद्योगपती अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग लखानी यांच्यासोबत विवाहबंधनात अडकली असून, ती आता लखानी कुटुंबाची सून झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या विवाहसोहळ्याची जोरदार लगबग सुरू होती आणि अखेर आज, 20 जून रोजी त्यांचा हा शाही विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आहे. या मुख्य सोहळ्यापूर्वी गेल्या काही दिवसांपासून लग्नाआधीच्या विविध समारंभांना आणि धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली होती, ज्याचे फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. नुकतीच सुप्रिया सुळे यांच्या घरी पार पडलेल्या विशेष पूजेचे आणि हळदीच्या कार्यक्रमाचे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. या व्हायरल फोटोंमध्ये हळदीच्या समारंभासाठी रेवतीने पिवळ्या रंगाची साडी परिधान केल्याचे पाहायला मिळत असून, तिचा हा लूक अत्यंत मनमोहक दिसत आहे. सुप्रिया आणि सदानंद सुळे यांची कन्या रेवती सुळे हिने ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीत तिने प्रथमच सक्रिय राजकारणात सहभाग घेत आपल्या आईसाठी जोरदार प्रचारही केला होता. सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या या शाही विवाहसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, नेटकऱ्यांकडून या जोडप्यावर लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. जावई सारंग लखानी कोण आहेत? सुप्रिया सुळे यांचा जावई सारंग लखानी हा ‘विश्वराज ग्रुप’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी यांचा सुपुत्र आहे. व्यावसायिक पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील सारंग हा एक उत्कृष्ट बॅडमिंटनपटू देखील असून, त्याने आजवर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *