Headlines

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी डॉ. हर्षाली देशमुख यांचा संवाद:रोजगारनिर्मिती व महिला सक्षमीकरणातील कार्याची दखल; मुंबईच्या उद्योजिकेला मिळाला सन्मान




महाराष्ट्रातील उद्योजिका डॉ. हर्षाली देशमुख यांना प्रधानमंत्री रोजगाराशी निगडित लाभ योजना (PMBBRY) अंतर्गत आयोजित लाभ वितरण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळाली. रोजगारनिर्मिती आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO), प्रादेशिक कार्यालय, नरिमन पॉईंट, मुंबई यांनी त्यांचे नामांकन केले होते. कार्यक्रमादरम्यान डॉ. देशमुख यांनी आपल्या उद्योजकीय प्रवासाची, रोजगारनिर्मितीसाठी केलेल्या प्रयत्नांची तसेच युवक आणि महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती पंतप्रधानांना दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या आर्थिक विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या उद्योजकांचे कौतुक करत रोजगारनिर्मिती आणि महिला सक्षमीकरणाला अधिक प्राधान्य देण्याचे आवाहन केले. तसेच, उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या अनुभवाबद्दल बोलताना डॉ. हर्षाली देशमुख म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळणे हा माझ्या आयुष्यातील अत्यंत अभिमानाचा आणि अविस्मरणीय क्षण आहे. देशाच्या सर्वोच्च नेतृत्वासमोर आमचा उद्योजकीय प्रवास, कर्मचाऱ्यांच्या यशोगाथा आणि रोजगारनिर्मितीतील आमचे योगदान मांडण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी मोठी प्रेरणा आहे.” या संधीसाठी त्यांनी पंतप्रधान कार्यालय (PMO) तसेच EPFO प्रादेशिक कार्यालय, नरिमन पॉईंट, मुंबई येथील अधिकारी आणि कर्मचारी यांचे आभार मानले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि सहकार्यामुळे हा संवाद यशस्वीरीत्या पार पडल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. हर्षाली देशमुख यांचा हा संवाद केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर मुंबई, महाराष्ट्र आणि देशातील उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. रोजगारनिर्मिती, महिला सक्षमीकरण आणि राष्ट्रनिर्मितीसाठी कार्य करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देणारी ही घटना असल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *