Headlines

स्मशानभूमीच्या प्रश्नांचा आढावा घेण्याची गरज- संजय गव्हाणे:माटेगावला स्मशानभूमी प्रश्नांवरून बेबनाव‎




कन्नड तालुक्यात वर्षानुवर्ष अनेक गावांमध्ये वंचित समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न सुटलेला नाही. त्या प्रश्नांचा आढावा घेण्यात येईल असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य डॉ. संजय गव्हाणे यांनी माटेगाव येथे केले. माटेगाव येथे स्मशानभूमीस रस्ता नाही. या प्रश्नी ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण केले होते. या प्रश्नी स्थळ पाहणी करण्यासाठी डॉ.गव्हाणे, भूमी अभिलेख विभागाचे भूमापक प्रभाकर ताठे, ग्राम पंचायत अधिकारी सी.आर. पवार, एस.बी. दांडगे, बिट जमादार के. यू. राजपूत, सामाजिक कार्यकर्ते किशोर दिवेकर, अनिल सिरसाठ, विनोद अंभोरे यांनी भेट दिली. स्मशानभूमीस जाण्यासाठी रस्ता नाही, चोहूबाजूने अतिक्रमण झाले आहे. यावेळी दोन्ही समाजगटात बेबनाव निर्माण झाला. यावेळी गव्हाणे यांनी स्मशानभूमी लगतचे अतिक्रमण निर्मूलन करण्यासाठी कारवाई करावी असे निर्देश दिले.‌ तालुक्यातील सर्व वंचित समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न सोडविण्यासाठी बैठक घेण्यात येईल असेही ते म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *