![]()
साखरखेर्डा पुढील दोन दशकांत हवामानातील अनिश्चितता वाढणार असून, पारंपरिक शेतीसोबत वैज्ञानिक नियोजन स्वीकारल्याशिवाय शेती टिकणार नाही. प्रत्येक थेंब पाण्याचे संवर्धन, बदलत्या पावसाच्या स्वरूपानुसार पीकनियोजन आणि शेतकऱ्यांची संघटित ताकद हेच भविष्यातील शेतीचे आधारस्तंभ ठरणार आहेत, असा दूरदृष्टीचा संदेश हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिला. लोकशिक्षण संस्थेचे वतीने या व्याख्यानाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तोताराम कायंदे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार सुखदेव काळे,मुकुंदराव देशमुख, काळे महाराज,काशिनाथ महाराज हरकळ, डॉ. शिवाजी खरात, भाजप नेते सुभाषराव घिके, डॉ.शिवाजी खरात, सरपंच प्रकाश मुंढे, आबासाहेब राजे भोसले, श्रीमंत राऊत, काशीनाथ नागरे, दत्ताराव देशमुख, प्रा. दिलीप नाईकवाड, हरिभाऊ राजे जाधव, दीपक घुगे, वैभव देशमुख, छगन खंदारे, जावेदभाई, सुरेश बुलकडे उपस्थित होते.व्याख्यानात पंजाबराव डख यांनी २०२६ ते २०५० या कालावधीतील हवामानातील संभाव्य बदलांचा वेध घेत पावसाचे स्वरूप, जलव्यवस्थापन, पीकपद्धती आणि शेतीच्या दीर्घकालीन नियोजनावर सखोल विवेचन केले. ग्रामीण भागातील गावरान आंबा, लिंबोळी आणि इतर नैसर्गिक संकेतांच्या आधारे हवामानाचा अंदाज बांधण्याच्या पारंपरिक पद्धतींची वैज्ञानिक बाजू त्यांनी उलगडून सांगितली. गारपीट, अवकाळी पाऊस, वातावरणातील बदलांचा शेतीवर होणारा परिणामही त्यांनी स्पष्ट केला. “जोपर्यंत शेतकरी संघटित होत नाही, तोपर्यंत त्याला न्याय्य भाव आणि सन्मान मिळणे कठीण आहे,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त करत शेतकऱ्यांना एकजुटीचे आवाहन केले. कार्यक्रमाला शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष बाळाजी सोसे, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, उपस्थित होते आभार ऋषिकेश देशमुख यांनी मानले. गणेशराजे जाधव यांचा सत्कार करताना माजी आमदार तोताराम कायंदे, पंजाबराव डख व उपस्थित अन्य मान्यवर.
Source link
हवामान बदल अटळ; प्रत्येक थेंब जपा,शेतीचे नियोजन बदला- पंजाबराव डख:किनगाव राजा येथे व्याख्यान, शेतकऱ्यांना संघटित होण्याचे केले आवाहन