![]()
महानगरपालिकेच्या मालकीच्या व्यावसायिक गाळ्यांवरील थकीत भाडेवसुलीसाठी प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. शहरातील महापालिकेच्या मालकीचे ५३५ व्यावसायिक गाळे आहेत. त्यापैकी ४९२ गाळेधारकांकडे तब्बल १४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामुळे सोमवारपासून (दि. २७) संबंध
.
महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे मालमत्ता कर, पाणीपट्टी, गाळेभाडे या प्रमुख महसुली स्रोतांमधून अपेक्षित वसुली होत नाही. त्यामुळे विकासकामांवर परिणाम होत आहे. थकबाकी वसूल करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गाळेधारकांनी वर्षानुवर्षे भाडे न भरल्यामुळे महापालिकेची थकबाकी १६ कोटी रुपयांवर पोहोचली होती. ही थकबाकी वसूल करण्यासाठी प्रशासनाने यापूर्वी नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर ४९ गाळेधारकांनी प्रतिसाद देत सुमारे १ कोटी २५ लाख रुपयांची थकबाकी भरली. मात्र उर्वरित गाळेधारकांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता महापालिकेने गाळे { उर्वरित पान ४