Headlines

हिंगोलीत धक्कादायक घटना:औंढा नागनाथमध्ये तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट




औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडी येथे तरुणीने घरात कोणीही नसताना गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात रविवारी ता. १४ अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजनवाडी येथील आरती शांतीराम घनसावंत (१७) हि तरुणी तिच्या कुटुंबियांसह राहते. घरी आई, वडील शेतात काम करीत असून आरती शिक्षण घेत होती. तिने नुकतीच बारावीची परिक्षा देऊन ६७ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली होती. रविवारी ता. १४ सकाळी १० वाजण्याच्या सुमारास तिचे कुटुंब शेतात गेले होते. घरी आई होती मात्र आई कामाच्या निमित्ताने शेजारच्या घरी गेली होती. यावेळी घरी कोणीही नसल्याचे लक्षात येताच आरतीने घरातील स्वयंपाक खोलीत टीन पत्राखालील लोखंडी पाईपला गळाफास घेतला. दरम्यान, काही वेळातच हा प्रकार घरासमोरून जाणाऱ्या शेजारच्या महिलेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडा ओरड केली. यावेळी परिसरातील गावकरी घटनास्थळी जमा झाले. त्यांनी तातडीने आरती हिला खाली काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केली. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तिचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले. घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास भगत, जमादार आर. वाय ठाकूर, एस. एल. चंद्रशेखर यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी शांतीराम घनसावंगत यांच्या माहितीवरून औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक भगत, जमादार ठाकूर पुढील तपास करीत आहे. मयत आरतीने आत्महत्या का केली याचे कारण अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *