Headlines

महावितरणचे अनुकंपा मार्गदर्शन:शिबिराला प्रतिसाद; 81 प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा करण्याचे मुख्य अभियंत्यांचे निर्देश




सेवाकाळात निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडल कार्यालयात बुधवारी (5 ऑगस्ट) अनुकंपा तत्त्वावरील नोकरीबाबत विशेष मार्गदर्शन शिबिर पार पडले. या शिबिरात प्रलंबित अर्जांमधील त्रुटी दूर करून पात्र वारसांना लवकरात लवकर सेवेत सामावून घेण्यावर भर देण्यात आला. परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख उपस्थितीत हे शिबिर पार पडले. या वेळी अधीक्षक अभियंता मनीष ठाकरे, गोरक्षनाथ सपकाळे, सहायक महाव्यवस्थापक शिल्पा काबरा, कार्यकारी अभियंता राजेंद्र नाहटा आणि उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे यांची मुख्य उपस्थिती होती. 81 प्रकरणांमधील कागदपत्रांची त्रुटी दूर करणार उपस्थितांशी संवाद साधताना मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी सांगितले की, गेल्या 10 वर्षांत छत्रपती संभाजीनगर परिमंडलात 85 वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात आली आहे. मात्र, काही कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे अजूनही 81 अवलंबितांचे अर्ज प्रलंबित आहेत. हीच अडसर दूर करून प्रक्रिया जलद करण्यासाठी या मध्यवर्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले. विविध 13 लाभांची माहिती व कायदेशीर सल्ला शिबिरादरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांशी थेट संवाद साधत त्यांच्या शंकांचे निरसन केले. उपस्थितांना अनुकंपा धोरणाची माहितीपुस्तिका तसेच मासिक निर्वाह भत्त्यासह मिळणाऱ्या तब्बल 13 प्रकारच्या लाभांची सविस्तर माहिती देण्यात आली. याशिवाय विधी विभागाने कायदेशीर बाबींवर मार्गदर्शन केले. 66 कुटुंबांनी घेतला लाभ या शिबिराचा छत्रपती संभाजीनगर शहर मंडलातील १४, ग्रामीण मंडलातील ३० आणि जालना मंडलातील २२ अशा एकूण 66 अवलंबितांनी लाभ घेतला. विभागीय कार्यालयातील उपव्यवस्थापकांना (मानव संसाधन) प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या कडक सूचना या वेळी देण्यात आल्या. योग्य मार्गदर्शन मिळाल्याने उपस्थित वारसांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वरिष्ठ व्यवस्थापक स्वाती चव्हाण-गाडेकर, व्यवस्थापक संजय खाडे, बापू शिंदे, सुरेखा कदम, विधी अधिकारी किशोरी तळेले, सुनील पावडे यांच्यासह मानव संसाधन व औद्योगिक संबंध विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *