Headlines

'हे सामूहिक नव्हे, तर तुमचं अपयश':पुणे पदवीधरच्या जागेवरून रुपाली पाटील ठोंबरेंचा सुनील तटकरेंवर घणाघात




पुणे पदवीधर मतदारसंघीची जागा अखेर भाजपकडे गेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असायची. मात्र यंदा राष्ट्रवादीला ही जागा मिळवता आली नाही. पुणे पदवीधर मतदारसंघ भाजपकडे गेला असून स्मिता जाधव या निवडणुकीच्या रंगणात उतरल्या आहेत. दरम्यान, ही जागा मिळवता नाही आली यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हे आमचे सामूहिक अपयश असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी टीका केली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत रुपाली पाटील ठोंबरे यांनी सुनील तटकरे यांच्यावर टीका केली आहे. त्या म्हणाल्या, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये माननीय तटकरे साहेब म्हणले की हे सामूहिक आमचं अपयश आहे. भाजपला आम्ही कमी पडलो सीट्स मागायला आणि हे आमचं सामूहिक अपयश आहे. तर तटकरे साहेब हे सामूहिक अपयश नाही, हे तुमचं अपयश आहे, अशी टीका रुपाली ठोंबरे यांनी केली आहे. अनिकेत तटकरेंच्या आमदारकीवरही भाष्य या अपयशाचे कारण सांगताना रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या. अजित दादा गेल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी त्यांच्या विचारावर, कामावर, पावलावर पाऊल ठेवून काम करतायत. परंतु ज्या वेळेला विधान परिषद माननीय अजित दादा कोणालाही रिपीट देणार नव्हते, त्यावेळी तुम्ही तुमच्या मुलासाठी म्हणजेच अनिकेतजी तटकरेंसाठी तिथे आमदारकी घेतली. आणि विधान परिषद तिथे खेचून आणली. त्याच्यासाठी ज्या काही गोष्टी करायच्या त्या तुम्ही केल्या. आणि त्याच्यासाठी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे जे काही पालकमंत्री पद होतं वाट्याला, त्याचं तुम्ही बलिदान दिलंत. तुमच्यामुळे अपयश आलं विनाकारण तुम्ही सामूहिक यश घेऊन, जर माननीय सुनेत्रा वहिनींच्या अपयशाला भागी करत असाल, तर साहेब तुम्ही चुकीचे आहात. हे अपयश तुमचं आहे, अशी टीका रुपाली ठोंबरे यांनी केली आहे. तसेच सगळ्यात महत्त्वाचं आपण महायुतीमध्ये आहोत. त्यामुळे भाजप असेल, आपण असू, शिंदे साहेबांची शिवसेना आहे, या वाटाघाटीमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचे शब्द दिलेले आहेत. त्यामुळे शिक्षक मतदारसंघ हा जरी पुणे शिक्षक मतदारसंघ आपला असला तरी त्याच्यामध्ये आपण महायुतीत असल्यामुळे शिवसेनेने सुद्धा त्याची मागणी केली होती. त्याच्यामुळे या सगळ्या ज्या काही महायुतीच्या संवादामध्ये आहे, चर्चेमध्ये आहेत, तुमच्यामुळे अपयश आलेलं आहे आणि तुमच्यामुळे त्या जागा भाजपने स्वतःकडे घेतलेल्या असतील. मुलाला निवडून आणण्यासाठी पालकमंत्री पद दावणीला लावले पुढे बोलताना रुपाली ठोंबरे म्हणाल्या, हे सामूहिक अपयश म्हणू नका कृपया. हे तुमच्यामुळे मिळालेलं अपयश आहे. आणि राहिला विषय सुनेत्रा वहिनींचा. काम ज्या पद्धतीने त्या करतायत, ती माऊली आजही दादा गेल्यानंतर एवढं आभाळाएवढं दुःख घेऊन लढतीये. ठीक आहे. फक्त जबाबदारी निश्चित करताना सोयीची जबाबदारी निश्चित करू नका. तुमचा मुलगा निवडून आणला, पालकमंत्री पक्षाचं पालकमंत्री पद दावणीला लावलं, तर ते यश तुमचं. आणि इतर ज्या काही गोष्टी तुमच्यामुळे पक्षाला बघाव्या लागल्यात, त्याचं अपयश मात्र तुम्ही सुनेत्रा वहिनींवर देऊ शकत नाही. एवढंच मला तुम्हाला सांगायचंय.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *