![]()
गेल्या तीन ते चार वर्षांपासून कन्नड तालुक्यातील जलजीवन मिशनचे काम रखडले आहे. लोकप्रतिनिधी आणि ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे पाणीटंचाईने जनता होरपळत आहे. तालुक्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत २१२ गावांपैकी १७६ गावांत पाणीपुरवठ्याची कामे २०२२ मध्ये सुरू करण्यात आली आहेत. कामे सुरू होऊन चार वर्षे उलटून गेली तरी कामे प्रगतिपथावरच आहेत. तीन गावांत तर काहीच काम झालेले नाही. २९ गावात ५० टक्यांपेक्षा कमी कामे झालेली आहेत. ९५ ते ५० टक्के कामे झालेली १३५ गावे आहेत. वीस गावांत योजना पूर्ण झाली आहे. जलजीवन मिशनची १७६ कामे दहा गुत्तेदार करीत आहेत. एका एका गुत्तेदाराकडे १० ते २५ गावांची कामे आहेत. चार वर्षे उलटूनही बहुतांश कामे अद्याप अपूर्ण आहेत. कामे सुरू करताना हे काम कधी पूर्ण करायचे, या कामाचा अवधी निश्चित करण्यात आलेला असतो. तितक्या दिवसांत काम पूर्ण करणे बंधनकारक असते. जितक्या दिवस विलंब लागेल तितक्या दिवसाचा विलंब दंड आकारण्यात येतो. पण, आजवर किती गुत्तेदारांना दंड लावला हे सांगावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. तालुक्यातील १७६ कामांवर देखरेख ठेवण्यासाठी एजन्सी नॅपकॉन या खासगी कंपनीची नियुक्ती आहे, तर कामांची गुणवत्ता तपासणीही खासगी कंपनी टाटा कन्सल्टन्सी कंपनीकडे आहे. कन्नडला ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागीय कार्यालय आहे, मात्र तेही नावालाच असल्याचे बोलले जाते. दुसरीकडे २०२३ मध्ये विहीर अधिग्रहण करून टँकरद्वारे सत्तेचाळीस गावांना पाणीपुरवठा करण्यात आला. या वर्षी मार्च महिन्यापासूनच पाणीटंचाईला तालुका समोरा जात आहे. भिलदरी (पिशोर), सायगव्हाणसारख्या गावांना योजना असूनही पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. वेळेत कामे पूर्ण करून घेण्यात अपयशी ठरलेल्या अभियंता, कर्मचारी आणि ठेकेदार यांच्याकडून वाया गेलेला खर्च वसूल करण्यात यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कृषिभूषण भाऊसाहेब थोरात व कार्यकर्त्यांनी केली. निधी अपुरा, कामातही व्यत्यय ^कुंजखेडा, जैतखेड अशा गावांमध्ये विहीर, टाक्या पूर्ण झालेल्या आहेत. मात्र वन विभागाने पाइपलाइन करून देण्यास परवानगी दिली नाही. रोहिला, हतनूर येथील नागरिकांनी अडचणी निर्माण केल्या आहेत. जलजीवन मिशनचे उपअभियंता सांगूनही इन्फेक्शनसाठी आलेच नाहीत. त्यामुळे कामे अर्धवट अवस्थेत आहेत. शासनाकडे साडेचार कोटी रुपये थकीत आहेत. त्यात माझे कामे रद्द करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. ही कामे कोणता गुत्तेदार पूर्ण करणार आहे? -संघर्ष बोलधने, गुत्तेदार
Source link
156 गावांत जलजीवनची कामे 4 वर्षांपासून अर्धवट:योजना मोठी, पण अंमलबजावणी विलंबाने; 3 गावांत काम जागीच