![]()
जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने धरणातील पाण्याची आवक घटली आहे. गुरुवारी तिसऱ्या दिवशी १८ पैकी दहा दरवाजे बंद करण्यात आले असून, उर्वरित आठ दरवाजांतून ४ हजार ३२८ क्युसेक वेगाने गोदावरी पात्रात पाणी सोडले जात आहे. सध्या धरणात २१,४८७ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. सध्या जायकवाडी धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून प्रत्येकी १,१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून एकूण विसर्ग ६ हजार ५२८ क्युसेक इतका आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता गणेश हासे यांनी दिली. धरणात सध्या ९३.०१ टक्के पाणीसाठा (७१.३० टीएमसी) उपलब्ध असून पाणीपातळी १५२०.७२ फुटांवर पोहोचली आहे. गेल्या काही तासांत सरासरी आवक २१ हजार ४८७ क्युसेकवर घसरल्याने विसर्ग कमी करण्यात आला आहे. आपेगाव, हिरडपुरी येथील बंधारे पूर्णक्षमतेने भरले तीन दिवसांत मुख्य १८ दरवाजांतून सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदी पात्रातील आपेगाव व हिरडपुरी हे दोन्ही बंधारे तुडुंब भरले आहेत. यामुळे परिसरातील शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. या बंधाऱ्यांमध्ये कायमस्वरूपी पाणी राहील असे नियोजन केले जाईल, असे आमदार विलास भुमरे यांनी सांगितले.
Source link
18 पैकी 10 दरवाजे बंद:जायकवाडीतून 23,806 क्युसेकने विसर्ग घटवला, 8 दरवाजांतून विसर्ग