Headlines

खासदार सुप्रिया सुळे भावूक:विमान अपघाताच्या चौकशीवर सरकारला सवाल; सत्ताधाऱ्यांवर कडक टीका

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आज दिवंगत अजित पवार यांच्या आठवणीने चांगल्याच भावुक झाल्या. माझा भाऊ गेलाय, आजही तो खरेच गेलाय का? हे आठवून आमच्या अंगावर काटा येतो, असे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी कौटुंबिक आठवणी, शरद पवारांचे आरोग्य व अलीकडील विमान अपघाताच्या प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाही चढवला. सुप्रिया सुळे यांनी आज…

Read More

केदारनाथमध्ये यंदा स्नो कॉरिडॉरमधून भाविकांचा प्रवास:5 फूट उंच बर्फ कापून रस्ता तयार करण्यात आला, सामान घेऊन पोहोचू लागले खेचर

केदारनाथ धामचे दरवाजे 22 एप्रिल रोजी सामान्य भाविकांसाठी उघडले जातील. दरवाजे उघडण्यापूर्वी धाम आणि यात्रा मार्गाचे जे चित्र समोर येत आहे, ते यावेळी पूर्णपणे बदललेले आहे. एप्रिलमध्ये झालेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे केदारनाथ दरी पूर्णपणे पांढरीशुभ्र झाली आहे. दरवाजे उघडण्यापूर्वी दोन दिवस आधी बाबांची डोली गौरीकुंडला पोहोचली आहे आणि यासोबतच यात्रा व्यवस्था अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. यावेळी…

Read More

शेतकरी विरोधी व्यापार करार रद्द करा:स्वस्त विदेशी शेतीमालामुळे देशांतर्गत बाजारपेठ धोक्यात, हिंगोलीत काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन

केंद्र शासनाचा प्रस्तावित भारत- अमेरिका व्यापार करार तातडीने रद्द करावा या मागणीाठी हिंगोलीत काँग्रेसच्या वतीने मंगळवारी ता. 21 धरणे आंदोलन करण्यात आले आहे. येथील महात्मा गांधी चौकातील संविधान कॉर्नर येथे आयोजित या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर सराफ, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रशांत उर्फ बंटी नागरे, सुशांत लोखंडे, शांमराव जगताप, मिलींद उबाळे, शेख जुबेर मामू, संग्राम…

Read More

रितेश-जिनेलियाच्या 'राजा शिवाजी'ची सर्वत्र चर्चा:मुलगा राहिल देशमुखही झळकणार पडद्यावर, चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर लाँच

रितेश देशमुख आणि जिनेलिया यांचा ‘राजा शिवाजी’ हा आगामी चित्रपट अनेक अर्थांनी खास असून, यामध्ये रितेशने छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारण्यासोबतच स्वतः या चित्रपटाच्या दिग्दर्शन आणि निर्मितीची धुराही सांभाळली आहे. या चित्रपटात जिनेलिया महाराणी सईबाईंच्या भूमिकेत झळकणार असून, त्यांचे कौटुंबिक महत्त्व वाढवणारी आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे या सिनेमाद्वारे त्यांचा धाकटा मुलगा राहिल देशमुख…

Read More

रोहित पवारांचा भाजपवर गंभीर आरोप:म्हणाले – महिला आरक्षणाच्या नावाखाली सरकारचा मतदारसंघ फोडण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. २०२३ मध्ये मंजूर झालेले महिला आरक्षण विधेयक हे प्रत्यक्षात महिलांना न्याय देण्यासाठी नसून, मतदारसंघांची पुनर्रचना (डिलिमिटेशन) करून स्वतःच्या फायद्यासाठी खासदार वाढवण्याचा भाजपचा छुपा अजेंडा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रोहित पवार म्हणाले की, “२०२३ मध्ये जे विधेयक पास…

Read More

अशोक खरातचा नवा घोटाळा उघड:32 बनावट खात्यांतून 57 लाखांची अफरातफर; भोंदूगिरीतून खरातचा आणखी एक मोठा पर्दाफाश

नाशिक जिल्ह्यात स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणून मिरवणाऱ्या अशोक खरातच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आधीच विविध गंभीर आरोपांना सामोरे जात असताना आता त्याच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. सिन्नर येथील जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत एका व्यक्तीच्या नावाचा गैरवापर करून 32 बनावट खाती उघडण्यात आल्याचे उघड झाले आहे. या खात्यांच्या माध्यमातून…

Read More

शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात:सुप्रिया सुळे यांनी दिली माहिती; म्हणाल्या – सध्या टेस्ट सुरू, त्यानंतरच त्यांच्या प्रकृतीविषयी स्पष्टता येईल

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते सध्या मुंबई स्थित ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. तिथे त्यांच्या काही टेस्ट सुरू आहेत. त्या झाल्यानंतरच त्यांच्या प्रकृतीविषयीची स्पष्टता येईल, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे शरद पवार यांना मागील महिन्यातच पुण्यातील एका रुग्णालयात दाखल…

Read More

निसर्गप्रेमींचा नाशिक महापालिकेवर मोर्चा:जोरदार घोषणाबाजी करत वृक्षतोडीच्या निर्णयाचा केला विरोध; सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी झाडांची कत्तल!

नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. या वृक्षतोडीला नाशिक महापालिकेने परवानगी दिली होती. निसर्गाची हानी झाल्याने निसर्गप्रेमी रस्त्यावर उतरले असून आज त्यांनी महापालिकेवर जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा काढला होता. सिंहस्थ कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सुरू असलेल्या विकासकामांमध्ये वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तपोवनातील वृक्षतोडीचे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट असतानाच, नाशिक महानगरपालिकेने…

Read More

महागडे मोबाईल, मुलींवर खर्च आणि फसवणूक:चैनीसाठी आईचे दागिने विकले; अयानच्या आयुष्याचा काळा पैलू समोर, बंदुकीबाबतही स्पष्टीकरण

परतवाडा येथील लैंगिक शोषण, अश्लील व्हिडिओ व्हायरल आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणात मुख्य आरोपी अयान अहमद याच्याबाबत एकामागोमाग एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. चौकशीदरम्यान अयानने आपल्या विलासी सवयी पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या आईचे दागिने चोरून विकल्याचे उघड झाले आहे. त्याच्या सोशल मीडियावरील व्हिडिओंमध्ये दिसणारी पैशांची बंडले ही प्रत्यक्षात या दागिन्यांच्या विक्रीतून मिळालेली रक्कम असल्याची माहिती तपासात समोर…

Read More

महिला आरक्षणावरून भाजप लोकांची दिशाभूल करत आहे:अडीच वर्षांपूर्वी बिल पास होऊनही अंमलबजावणी का नाही? अनिल देशमुखांचा भाजपला सवाल

अनिल देशमुख म्हणाले की, महिला आरक्षण विषय घेत लोकांची दिशाभूल करायची हे भाजपने ठरवले आहे. त्यासाठी ते आंदोलन करत आहेत, 5 राज्यातील निवडणुकीत याचा फायदा व्हावा यासाठी हे सर्व काही सुरू आहे, असे शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. अनिल देशमुख म्हणाले की, महिला आरक्षणाच्या आडून भाजपकडून सर्व राजकारण सुरू आहे. हे…

Read More