भुकेल्यांना अन्न आणि तहानलेल्यांना पाणी देण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा:समाधान महाराज शर्मा यांचे प्रतिपादन, गंगापूर येथील श्रीराम कथा
प्रतिनिधी | गंगापूर देवाने सर्व दु:खे द्यावीक, परंतु दरिद्रीसारखं दु:ख कोणाला देऊ नये. भुकेल्यांना अन्न व तहानलेल्यांना पाणी देण्यासाठी आपापल्या परीने प्रत्येकाने प्रयत्न करावा, असे प्रतिपादन समाधान महाराज शर्मा यांनी केले. सत्संगाच्या माध्यमातून भाविकांमध्ये आत्मसाक्षात्कार, ईश्वरभक्ती आणी जीवनात सुधारणा घडवून आणणे या उद्देशासाठी रामकथेचे आयोजन करण्यात आले असून त्यादृष्टीने भाविकांनी कथेचे स्रवण करावे, असे मतही…