Headlines

राज्यपालांच्या हस्ते भारतीय विद्यापीठ संघाच्या महासभेचे उद्घाटन:डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात 100 व्या शताब्दी परिषदेला सुरुवात

महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात ‘असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज्’ (AIU) च्या १०० व्या वार्षिक महासभेचे आणि कुलगुरूंच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन झाले. ही परिषद २८ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. परिषदेचा मुख्य विषय “ज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधनाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताला आकार देणे”…

Read Full News

गुजरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक- सर्व 15 मनपांमध्ये भाजप विजयी:अहमदाबादमध्ये पोलिस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट

गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. राज्यातील 15 महानगरपालिका, 84 नगरपालिका, 34 जिल्हा परिषदा आणि 260 तालुका पंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू आहे. यामध्ये 9992 जागा आहेत. भाजपने आतापर्यंत 6161 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला 1315 तर इतरांना 592 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत भाजपचा स्ट्राइक रेट 76% आहे. आम…

Read Full News

बाजीराव पेशवे यांना जातीयवादात मर्यादित करू नका:इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत यांचे 'पालखेडची लढाई' विषयावर व्याख्यान

इतिहास अभ्यासक आणि व्याख्याते जगन्नाथ लडकत यांनी महाप्रतापी श्रीमंत बाजीराव पेशवे यांना जातीयवादात मर्यादित न करण्याचे आवाहन केले आहे. बाजीराव पेशवे यांचे कर्तृत्व जागतिक पातळीवर अनेक योद्धे, सेनापती आणि इतिहासकारांनी वाखाणले आहे. जगातील दहा महत्त्वपूर्ण लढायांमध्ये त्यांच्या पालखेडच्या लढाईचा समावेश असून, अनेक देशांच्या युद्धविषयक अभ्यासक्रमांत त्यांच्या लढायांचे दाखले दिले जातात, असे लडकत म्हणाले. पूना गेस्ट…

Read Full News

तरुणाचा खून करून मृतदेह नदीपात्रात फेकला:फरार आरोपीला सहा वर्षांनी बेड्या, खराडी पोलिसांची पुण्यात कारवाई

खराडी पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात सहा वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक केली आहे. तेजस अमृत ढेरे (वय ३६, रा. मुंढवा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने एका तरुणाचा खून करून मृतदेह नदीपात्रात फेकून दिला होता. ही घटना २०१९ मध्ये चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. राहुल शिवाजी शेलार (वय २४, रा. दातेवाडी, सातारा)…

Read Full News

व्हॉट्सॲपने 9,400 हून अधिक खाती बॅन केली:कंबोडियातून भारतात डिजिटल अरेस्टचे जाळे सुरू होते; फसवणूक रोखण्यासाठी 4 नवीन फीचर

‘डिजिटल अरेस्ट’ घोटाळा रोखण्यासाठी व्हॉट्सॲपने 9,400 हून अधिक संशयास्पद खाती बंद केली आहेत. ही कारवाई जानेवारी 2026 पासून सुरू झालेल्या 12 आठवड्यांच्या कालावधीत सरकारी एजन्सींकडून मिळालेल्या माहितीच्या आणि कंपनीच्या अंतर्गत तपासणीच्या आधारावर करण्यात आली आहे. ही माहिती ॲटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली आहे. न्यायालय सध्या देशात वाढत्या डिजिटल घोटाळ्यांच्या प्रकरणांवर स्वतःहून…

Read Full News

छत्रपती संभाजीनगर मनपात 10 स्वीकृत सदस्यांना प्रमाणपत्र:महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत कार्यक्रम; विकासकामांमध्ये सहभागाचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मुख्यालयातील प्रशासकीय समिती सभागृहात आज नामनिर्देशित स्वीकृत सदस्यांना प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात 10 नवीन स्वीकृत सदस्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमास महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ आणि स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांची प्रमुख उपस्थिती होती. महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या हस्ते स्वीकृत सदस्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात…

Read Full News

मोदी म्हणाले- महिलांना सपा-काँग्रेसने धोका दिला:घराणेशाहीचे पक्ष नारीशक्तीला घाबरले आहेत; मी तुम्हाला आरक्षण मिळवून देणारच

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी काशीला पोहोचले. येथे नारी वंदन महिला संमेलनात पंतप्रधानांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. सपा-काँग्रेस, टीएमसी आणि डीएमकेला परिवारवादी पक्ष म्हटले. पंतप्रधान म्हणाले, ४० वर्षांपासून महिला आरक्षण रखडले होते. आम्ही २०२३ मध्ये नारी शक्ती अभिनंदन पारित केले. हा कायदा लागू व्हावा, यासाठी चर्चा ठेवली. सपा, काँग्रेस, टीएमसी, डीएमके सारख्या पक्षांनी देशातील महिलांना धोका…

Read Full News

एसटीपी उभारणार तीन नवे सेंटर ऑफ एक्सलन्स:पुणे विद्यापीठातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कची घोषणा

पुणे विद्यापीठाच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कतर्फे (एसटीपी) लवकरच तीन नवीन ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ सुरू करण्यात येणार आहेत. एसटीपीला ४० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पुणे इंटरनॅशनल सेंटर येथे आयोजित विशेष कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. यामध्ये ‘इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट’, ‘पॉलिसी रिसर्च’ आणि ‘जिओइन्फॉरमॅटिक्स व ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर’ या तीन सेंटर ऑफ एक्सलन्सचा समावेश आहे. या कार्यक्रमात…

Read Full News

आंबेडकर चळवळीतील घटक एकत्र न आल्यास पक्षविस्तार करणार:केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन, एकत्रीकरणाचे प्रयत्न अयशस्वी

आंबेडकर चळवळीतील घटक एकत्र न आल्यास पक्षविस्तार करणार:केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन, एकत्रीकरणाचे प्रयत्न अयशस्वी Source link

Read Full News

इंडिगो-एअर इंडियाने म्हटले – विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर:इंधन महाग झाल्याने कामकाज कठीण, सरकारने उत्पादन शुल्क आणि व्हॅट कमी करावा

आगामी काळात विमान प्रवास महाग होऊ शकतो, कारण एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) महाग झाल्यामुळे देशातील प्रमुख विमान कंपन्यांचा ऑपरेशन खर्च (चालवण्याचा खर्च) 20% पर्यंत वाढला आहे. एअर इंडिया, इंडिगो आणि स्पाइसजेट सारख्या मोठ्या विमान कंपन्यांच्या ‘फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्स’ (FIA) या संघटनेने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला पाठवलेल्या एका अहवालात मदतीची मागणी केली आहे. FIA ने…

Read Full News