NCP नेत्याने भर रस्त्यात टेबल ठेवून केक कापला:पुण्यातील येरवडा परिसरातील घटना; फटाक्यांची आतषबाजीही केली, 7 जणांवर गुन्हा
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने भर रस्त्यात टेबल टाकून वाढदिवसाचा केक कापल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सदर पदाधिकारी व त्याच्या मुलासह 7 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, किशोर राजाराम विटकर असे गुन्हा दाखल झालेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. किशोर विटकर हे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आहेत. येरवड्यातील गाडीतळ परिसरात त्यांचे संपर्क कार्यालय…