Headlines

कृष्णांची छापेमारी, 3 टेम्पो गुटखा जप्त‎:पदभार घेताच बार्शीत गोदामावर छापा; अन्न व औषधाचे पथक न आल्याने गुन्हा नोंद नाही‎

बार्शी उपविभागाचा अतिरिक्त कार्यभार हाती घेतल्यानंतर आयपीएस अंजना कृष्णा यांनी शनिवारी (दि. १६) बार्शी शहर पोलिस स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या बालाजी कॉलनीमधील एका बड्या विक्रेत्याच्या अवैध गुटखा साठा केलेल्या गोदामावर छापा टाकला. या कारवाईत लाखो रुपयांचा तब्बल तीन टेम्पोहून अधिक अवैध गुटखा साठा जप्त करण्यात आला. सदरची कारवाई आयपीएस कृष्णा यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने केली….

Read More

अद्याप तोडगाच नाही; कर्मचाऱ्यांचे आंदोलन:काळ्या फिती लावून काम, उद्यापासून देण्यात येणार धरणे‎

विविध प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्यावतीने पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला जिल्ह्यात तीव्र स्वरूप प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांसह विद्यापीठाचे कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्याने शैक्षणिक कामकाज विस्कळीत झाले आहे. दरम्यान आगामी सोमवारपासून भोजनावकाशात आपापल्या संस्थेसमोर धरणे, निदर्शने केली जाणार आहेत. शुक्रवार, १४ मेपासून हा लढा सुरु झाला. महासंघाचे अध्यक्ष…

Read More

परिचारिकांचे कामबंद आंदोलन:सेवा विस्कळीत होण्याची भीती, शल्य चिकित्सक, पालकमंत्र्यांची घेतली भेट‎

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी) येथे एका महिला अधिपरिचारिकेवर (नर्स) झालेल्या अत्याचाराची स्थानिक पोलिस प्रशासनाने दखल न घेतल्याने महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या स्थानिक शाखेने आज, शनिवार, १६ मे पासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनादरम्यान या परिचारिकांनी आज दिवसभरात पालकमंत्री, जीएमसीचे अधिष्ठाता, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक आणि सिटी कोतवालीचे ठाणेदार यांची स्वतंत्ररित्या…

Read More

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट‎:कपाशी बियाणे पहिल्याच दिवशी संपले; नाइलाजास्तव अन्य खरेदी

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात बियाणे विक्रीचा शुभारंभानंतर पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांची सर्वाधिक मागणी असलेले कपाशी बियाणे अजित-५ हे वाण संपल्याचे शनिवारी दिसून आले. शेतकऱ्यांनी सकाळीच अनेक कृषी केंद्रांवर धाव घेतली. मात्र त्यांना या बियाण्यांचा साठा संपल्याचे सांगण्यात आले. कृषी केंद्रांचे संचालक, तेथील कर्मचारी शेतकऱ्यांना अन्य बियाणे घेण्याचे सुचवत असल्याचे पहावयास मिळाले. मात्र शेतकरी त्याच वाणावर ठाम होते….

Read More

शेतकऱ्यांनी काढला ट्रॅक्टर महामोर्चा; प्रशासन हादरले:एकरी 300 ते 1 हजारांचा विमा देत फसवणूक; सरकारविरोधी घोषणा‎

तुटपुंजी विमा रक्कम देऊन शेतकऱ्यांची बोळवणूक करण्यात आली असून, एकरी ३०० ते एक हजार रुपयांचा विमा देत फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधींना वेळोवेळी निवेदने दिली. भेटी घेत व्यथा मांडली. तरीही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून शुक्रवारी (दि.१५) ट्रॅक्टर महामोर्चा काढून प्रशासनाला हादरा दिला….

Read More

‘खतरों के खिलाडी’मध्ये विशाल सिंहचे पुनरागमन होणार:म्हणाला- माझ्यामध्ये खूप उणिवा होत्या; महेंद्रसिंह धोनीच्या बोलण्याने मला बदलले

टीव्ही अभिनेता विशाल आदित्य सिंह पुन्हा एकदा ‘खतरों के खिलाडी 15’ या रिॲलिटी शोमध्ये दिसणार आहे. यापूर्वीही विशाल या शोचा भाग होता आणि अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. आता ‘डर का नया दौर’ या थीम असलेल्या या सीझनमध्ये तो पुन्हा एकदा शोमध्ये परत येत आहे. दैनिक भास्करशी खास बातचीत करताना विशालने आपल्या भीतीबद्दल, संघर्षाबद्दल, हृदय तुटण्याच्या…

Read More

वसमतजवळ भीषण अपघात:शेतातील काम आटोपून परतताना ट्रॅक्टर कालव्यात कोसळला, 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू

वसमत तालुक्यातील अकोली शिवारात ट्रॅक्टर कालव्यात पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी ता. 17 पहाटे उघडकीस आली आहे. वसमत ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. घरातील एकुलता एक मुलगा गेल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील अकोली येथील ज्ञानेश्‍वर उर्फ माऊली माधव कदम (18) याचे अकोली शिवारात शेत…

Read More

लोकरंगद्वारा नाट्य प्रशिक्षण शिबिराचा श्रीगणेशा:अभिनेता बनण्यासाठी प्रचंड मेहनतीची गरज, भारत गणेशपुरे; उद्घाटनाला मान्यवर उपस्थित‎

लोकरंग द्वारा आयोजित तीन दिवशीय अभिनय तथा नाट्य प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ झाला.‎ १७ मेपर्यंत चालणाऱ्या या नाट्य‎तथा अभिनय प्रशिक्षण शिबिराचे‎आयोजन करण्यात आले असून‎.भारत गणेशपुरे आणि अंकुरजी‎वाढवे हे दोन प्रसिद्ध अभिनेते‎नाट्य प्रशिक्षणाचे धडे या‎शिबिरामध्ये सर्वांना देत आहेत. ‎जिल्हाभरातील प्रशिक्षणार्थ्यांनी या‎नाट्य प्रशिक्षण शिबिरात सहभाग‎नोंदविला असून उद्घाटन‎समारंभा नंतर लगेच या शिबिराचा‎प्रारंभ झाला. सुरुवातीला सर्वांचा‎परिचय करून घेत दोन्ही‎अभिनेत्यांनी प्रशिक्षण…

Read More

शेतीच्या शाश्वततेसाठी हवे एकात्मिक प्रयत्न:आ. सावरकर यांचे प्रतिपादन, कृषी विद्यापीठाचा पाणी फाउंडेशनसोबत सामंजस्य करार‎

शेती व ग्रामीण भागाचा विचार करता देशांतर्गत कृषी विद्यापीठे व तत्सम संशोधन संस्थांच्या निरंतर प्रयत्नातून काळसुसंगत फायदेशीर शेती तंत्रज्ञान मुबलक प्रमाणात उपलब्ध असूनही त्याचा अपेक्षित वापर होत नाही. त्यामुळे गावखेड्याकडील शेतकरी विशेषतः युवावर्ग शे . आमदार रणधीर सावरकर म्हणाले की, ग्रामीण भारताच्या उभारणीसाठी शेती ही शाश्वत होणे आवश्यक आहे. ग्रामविकासाशी संबंधित शासकीय, निमशासकीय विभाग, पाणी…

Read More

‘लिंकिंग', कर्ज नाकारणाऱ्यांवर कारवाई:पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा बँका आणि खत कंपन्यांना कडक इशारा‎

खरीप हंगाम अवघ्या महिनाभरावर आला असून यंदा काही महत्त्वाच्या रासायनिक खतांची प्रचंड टंचाई सुरू झाली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांकडून मागणी असलेल्या खत किंवा बियाण्यांच्या विक्रीच्या वेळी विक्रेत्यांकडून ‘लिंकिंग’ (मुख्य खतासोबत दुसरे नको असलेले उत्पादन घेण्याची सक्ती) केले जाते. यामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते. या प्रकाराची गंभीर दखल घेत, लिंकिंग करण्यास बाध्य करणाऱ्या उत्पादक कंपन्या तसेच…

Read More