Headlines

महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष:समता परिषदेचा ‘समता चित्ररथ’ नागपुरात दाखल; संविधान चौकात नागरिकांची मोठी गर्दी

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती महोत्सवाचे औचित्य साधून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने तयार केलेला विशेष ‘समता चित्ररथ’ शनिवारी (16 मे) नागपूर शहरात दाखल झाला. रविवार, 17 मे रोजी सकाळी 9 वाजता हा चित्ररथ संविधान चौकात नागरिकांच्या दर्शनासाठी आणण्यात आला. यावेळी शिव-शाहू-फुले-आंबेडकरप्रेमी नागरिकांनी दर्शनासाठी आणि स्वागतासाठी मोठी गर्दी केली होती. केंद्र आणि…

Read More

प्लास्टिकमुक्तीसाठी चांपा ग्रामपंचायतीचा पॅटर्न:सुरू केली 'स्टील भांडी बँक', नागपूर विभागात मारली बाजी

नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील चांपा ग्रामपंचायतीने ‘स्टील भांडी बँक’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. यामुळे गावात प्लास्टिकमुक्तीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले गेले असून, थर्माकोल पत्रावळ्या आणि ‘युज अँड थ्रो’ संस्कृतीला मोठा आळा बसला आहे. हा उपक्रम महाराष्ट्रातील इतर ग्रामपंचायतींसाठी आदर्श ठरत आहे. नागपूर-उमरेड महामार्गावर असलेल्या चांपा गावात हॉटेल व्यवसाय, पर्यटकांची वर्दळ आणि सार्वजनिक कार्यक्रमांमुळे…

Read More

राज्यात पेट्रोल – डिझेल टंचाईच्या झळा:परभणी, बुलढाणा, वाशिममध्ये तीव्र टंचाई, पेट्रोल पंपांवर ग्राहकांत हाणामारी; पुण्यात मनसे आक्रमक

आखाती देशांतील घडामोडीमुळे अवघ्या जगाला इंधन टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्याच्या झळा आता हळूहळू महाराष्ट्रालाही बसत आहेत. राज्यातील परभणी, बुलढाणा व वाशिम या जिल्ह्यांतील बहुतांश पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे फलक लागलेत. त्यामुळे नागरिकांची काही मोजक्याच पंपांवर इंधनासाठी मोठी गर्दी होत आहे. यावेळी ग्राहकांत बाचाबाची होऊन वाद होत असल्यामुळे परिस्थिती गंभीर बनत आहे. दरम्यान, मनसेने…

Read More

शनिअमावास्येला पूजाविधीनंतर वाद, मित्र-मैत्रिणीची भोंदू बाबाकडून हत्या:साक्रीत अघोरी थरार; घटनेनंतर काही तासांत भोंदूला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नाशिकचा बोगस ‘डॉक्टर खरात’ आणि सोलापूरचा ‘मनोहर मामा’ यांच्या भोंदुगिरीच्या घटना ताज्या असतानाच, आता धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातही अंधश्रद्धेची रक्तरंजित घटना समोर आली आहे. तेथे एका कथित भोंदूबाबाच्या आश्रमात शनी अमावस्येच्या रात्री पूजाविधीसाठी गेलेल्या मित्र-मैत्रिणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. भोंदूबाबाच्या सापडलेल्या रुमालावरून या घटनेचे बिंग फुटले आणि काही तासांतच पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दरम्यान, पूजाविधीनंतर…

Read More

ओला, उबर, रॅपिडोचे अ‍ॅप हटवण्याच्या आदेशाला स्थगिती:राज्य सरकारने कायदेशीर पेचामुळे 24 तासांतच आपला निर्णय बदलला

महाराष्ट्र सायबर विभागाने राज्यात बेकायदा सुरू असलेल्या बाईक टॅक्सी सेवेवर आळा घालण्यासाठी ओला, उबर, रॅपिडो या कंपन्यांचे अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोअर व अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरून हटवण्याच्या आपल्या आदेशाला अवघ्या 24 तासांतच स्थगिती दिली आहे. सरकार आता या कंपन्यांचे कॅब व ऑटो सेवा विस्कळीत न करता केवळ बेकायदा बाईक टॅक्सी सेवा कशी बंद करायची? या मुद्यावर…

Read More

मुदत संपली तरी 12 नाशिकच्या तालुक्यांना केरोसीनची अद्यापही प्रतीक्षाच:येवला, पेठ, इगतपुरी या तीन तालुक्यांनाच वितरण

अमेरिका आणि इराण युद्धाच्या सावटामुळे देशात इंधन व गॅसटंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, सर्वसामान्यांची चूल पेटती राहावी यासाठी राज्य सरकारने शिधापत्रिकाधारकांना 61 रुपये प्रतिलिटर दराने केरोसीन देण्याचा निर्णय घेतला. मात्र, नाशिक जिल्ह्यात या निर्णयाची अंमलबजावणी कागदावरच असल्याचे चित्र आहे. मे महिना अर्धा संपला तरी जिल्ह्यातील 12 तालुके अद्याप केरोसीनच्या प्रतीक्षेत आहेत. 15 तालुक्यांसाठी तहसीलदारांनी…

Read More

सोलापुरात समर्थ सहकारी बँकेची नोंदणी वाचवण्याचा आटापिटा:आरबीआयचे निर्बंध कायम तरीही सहकार घेणार ‘समर्थ’ निवडणूक

आर्थिक घरघर लागलेल्या समर्थ सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध कायम असतानाही गेल्या आठ महिन्यांत सहकार विभागाने संचालक मंडळावर कोणतीही कारवाई केलेली नाही. उलट बँकेची नोंदणी वाचवण्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू केली. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने बँकेला प्रारूप मतदार याद्या सादर करण्याचे पत्र दिले. पुढे जाऊन निवडणुकीसाठी रिझर्व्ह बँकेची परवानगीही मिळवली. एनपीएचे प्रमाण वाढल्याने रिझर्व्ह बँकेने 8 ऑक्टोबर…

Read More

नीट पेपरफुटीच्या चौकशीचा आवाका वाढणार:नाशिक येथील बडे क्लासचालक CBI च्या रडारवर; पेपरफुटीत 'टेलिग्राम'चा प्रभावी वापर

नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने शुभम खैरनार नामक तरुणाला अटक केली आहे. त्यानंतर आता येथील अनेक मोठे मासे सीबीआयच्या रडारवर आलेत. यात शहरातील काही प्रतिष्ठित क्लासचालकांचाही समावेश आहे. शुभमनंतर या सर्वांची सीबीआयकडून चौकशी होणार असल्याची माहिती असल्यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. देशात गत 3 मे रोजी वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची…

Read More

सोलापुरात सीसीटीव्हीवर कापड टाकून दोरखंडाने एटीएम मशीन ओढले:गाडीत घालून नेले, हैदराबाद रस्त्यावरील सग्गम नगर रस्त्यावर पहाटे तीनची घटना

जुना विडी घरकुल पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सग्गम नगरातील एसबीआय बँकेचे एटीएम मशीन दोर बांधून कारने बाहेर ओढले. त्यानंतर 300 किलो वजनाचे हे मशीन घेऊन पसार झाल्याची घटना घडली. शुक्रवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास ही घटना घडली. मशीन फोडत असल्याची माहिती बँकेच्या नियंत्रण कक्षाला मिळताच, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे प्रमोद वाघमारे यांना फोन केला. त्यानंतर पोलिस…

Read More

घोडेगाव बाजारात बोकडाला 1 लाख 11 हजारांचा भाव:‘बकरी ईद’च्या पार्श्वभूमीवर सव्वा कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त‎

आगामी २७ तारखेला येणाऱ्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर, येथील प्रसिद्ध शेळी बाजारात बोकडांची विक्रमी आवक झाली. तर एका देखण्या बोकडाला तब्बल १ लाख ११ हजार रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला. हा व्यवहार संपूर्ण बाजारात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. छत्रपती संभाजीनगर, बीड, पुणे, नाशिक, कल्याण आणि ठाणे जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शेतकरी व व्यापारी बोकड खरेदी-विक्रीसाठी बाजारात दाखल झाले…

Read More