Headlines

अमरावती 45.4 अंश सेल्सिअसवर, उष्णतेचा 'येलो अलर्ट':16 मे पर्यंत तापमान वाढण्याची शक्यता, नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन

अमरावतीमध्ये तापमानाने पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे. आज शहराचे तापमान ४५.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने अमरावती जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट’ जारी केला असून, १६ मे पर्यंत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. गेल्या पंधरवड्यात अमरावतीचे तापमान ४३ ते ४६ अंश सेल्सिअस दरम्यान होते, तर यापूर्वी ४६.७ अंश सेल्सिअसचा विक्रमी तापमानाची नोंद…

Read More

सांगलीच्या जतमध्ये मंदिराची भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू:मरगुबाई देवीच्या यात्रेत भीषण दुर्घटना, वादळी वारा आणि पावसामुळे पडली भिंत

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मोटेवाडी गावच्या हद्दीत वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने मोठा हाहाकार माजवला असून, येथील एका मंदिराच्या परिसरातील भिंत कोसळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत अन्य काही भाविक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निसर्गाच्या या प्रकोपामुळे घडलेल्या या भीषण अपघातामुळे संपूर्ण सांगली…

Read More

जीएमसी आलियाबादमध्येच होणार, जागेचा तिढा सुटला:डीनला आरक्षण बदलण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी) आता आलियाबाद येथेच उभारले जाणार आहे. या जागेचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला तिढा सुटल्याचे संकेत मिळाले आहेत. शासनाच्या कक्ष अधिकारी प्रियंका कागिनकर यांच्या स्वाक्षरीने अधीष्ठाता (डीन) डॉ. नंदकिशोर राऊत यांना एक पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रानुसार, जागेचे आरक्षण बदलवण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद:पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी रद्द केला लंडन-पॅरिस दौरा, कौटुंबिक सहलीचे होते नियोजन

देशातील सध्याची कठीण आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी चलनाची बचत करण्यासाठी अनावश्यक परदेश दौरे आणि खर्च टाळण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्राचे पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याणमंत्री, शंभूराज देसाई यांनी आपल्या कुटुंबासोबत नियोजित असलेला युरोप दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. माहितीनुसार, सुमारे तीन महिन्यांपूर्वी…

Read More

मुंबईच्या जे.जे रुग्णालयातील डॉक्टरची आत्महत्या:गळफास घेत संपवले आयुष्य, मानसिक तणावात असल्याची माहिती

मुंबईतील प्रतिष्ठित सर जे. जे. रुग्णालय परिसरातील डॉक्टर निवासात राहणाऱ्या एका 26 वर्षीय निवासी डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली आहे. डॉ. अभयसिंग नरसिंग मोरे असे मृत डॉक्टरचे नाव असून, ते रुग्णालयातील रेडिओलॉजी विभागाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होते. जे. जे. रुग्णालय संकुलातील नर्सिंग हॉस्टेलच्या सहाव्या मजल्यावरील रूम क्रमांक 604…

Read More

RSS महासचिव म्हणाले- पाकिस्तानशी चर्चेचे दरवाजे बंद होऊ नयेत:होसाबळे म्हणाले- तेथील खेळाडू-वैज्ञानिक पुढे यावेत, दोन्ही देशांमध्ये जुने संबंध

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) चे राष्ट्रीय सरचिटणीस दत्तात्रेय होसाबळे यांनी सांगितले की, भारताने पाकिस्तानसोबत चर्चेचे दरवाजे पूर्णपणे बंद करू नयेत. त्यांचे मत आहे की, दोन्ही देशांमधील जनतेचे जनतेशी असलेले संबंध तणाव कमी करण्यात मोठी भूमिका बजावू शकतात. होसाबळे म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सांस्कृतिक संबंध जुने आहेत आणि आपण एकच राष्ट्र राहिलो आहोत. ते…

Read More

जॅकलीन फर्नांडिसने सरकारी साक्षीदार बनण्याची याचिका मागे घेतली:ईडीने केला होता विरोध; 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित प्रकरण

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने मंगळवारी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टातून आपला तो अर्ज मागे घेतला आहे, ज्यात तिने 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सरकारी साक्षीदार बनण्याची मागणी केली होती. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) तिच्या या अर्जाला तीव्र विरोध केला होता. तपास यंत्रणेचे म्हणणे आहे की, जॅकलिन या प्रकरणात कोणतीही पीडित नसून या गुन्ह्याची मुख्य लाभार्थी राहिली…

Read More

केंद्रीय मंत्री बंदी संजय यांच्या मुलावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा:अल्पवयीन मुलीवर लैंगिक छळाचा आरोप; अग्रिम जामीन याचिका दाखल केली, म्हणाले – हनी ट्रॅपचा प्रयत्न झाला

भाजप सरकारमधील केंद्रीय मंत्री बंदी संजय कुमार यांचा 25 वर्षीय मुलगा साई भागीरथ याच्यावर 17 वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचा आरोप आहे. अल्पवयीन मुलीच्या आईने 8 मे रोजी तेलंगणातील हैदराबाद येथे पॉक्सो कायद्यांतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. भागीरथने 12 मे रोजी तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याने अटकपूर्व जामिनासोबतच आपल्याविरुद्ध दाखल केलेला फौजदारी गुन्हा रद्द…

Read More

10वी, 12वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर:जून-जुलै 2026 मधील परीक्षा 16 जूनपासून सुरू होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जून-जुलै २०२६ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता १०वी आणि १२वी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक मंगळवारी अधिकृतपणे जाहीर केले आहे. या परीक्षा राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेतल्या जाणार आहेत. जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, इयत्ता १२वीची लेखी परीक्षा…

Read More

चोपड्यातील पंकज नगर भागात दीड महिन्यांपासून विजेचा लपंडाव:संतप्त नागरिकांनी अभियंत्यांना धरले धारेवर, बिऱ्हाड आंदोलनाचा इशारा

चोपडा शहरातील पंकजनगर आणि परिसरातील नागरिक गेल्या दीड-दोन महिन्यांपासून विजेच्या भीषण समस्येमुळे मेटाकुटीला आले आहेत. ४५ अंशांच्या घरात पोहोचलेल्या तापमानात वारंवार वीज गुल होत असल्याने आणि विजेच्या दाबात (व्होल्टेज) कमालीची अनियमितता असल्याने रहिवाशांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर, आज संतप्त नागरिकांनी पंकज समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले आणि कृती समितीचे समन्वयक एस. बी. पाटील…

Read More