![]()
मुंबईतील प्रतिष्ठित सर जे. जे. रुग्णालय परिसरातील डॉक्टर निवासात राहणाऱ्या एका 26 वर्षीय निवासी डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली आहे. डॉ. अभयसिंग नरसिंग मोरे असे मृत डॉक्टरचे नाव असून, ते रुग्णालयातील रेडिओलॉजी विभागाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होते. जे. जे. रुग्णालय संकुलातील नर्सिंग हॉस्टेलच्या सहाव्या मजल्यावरील रूम क्रमांक 604 मध्ये राहणाऱ्या डॉ. मोरे यांनी आपल्या राहत्या खोलीत हे टोकाचे पाऊल उचलले. या दुर्दैवी घटनेमुळे रुग्णालय प्रशासन आणि वैद्यकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. डॉ. मोरे हे मूळचे धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील दसेमगाव येथील रहिवासी असून, ते गेल्या काही काळापासून मानसिक तणावाखाली असल्याने त्यांच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून औषधोपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रीतसर पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तरुण डॉक्टरने उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. डंपर चालकाची 1200 फूट खोल दरीत उडी मारून आत्महत्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात एका डंपर चालकाने 1200 फूट खोल दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजाराम रघुनाथ कुडतरकर असे मृत चालकाचे नाव असून, घाटात डंपर बेवारस स्थितीत उभा असल्याचे पाहून मालक मायकल डिसोजा यांना संशय आला. त्यांनी ड्रोनच्या साहाय्याने दरीची पाहणी केली असता कुडतरकर यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच सह्याद्री एडव्हेंचर अँड रेस्क्यू टीमने अत्यंत कठीण परिस्थितीत खोल दरीत उतरून मृतदेह बाहेर काढला असून, या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
Source link
मुंबईच्या जे.जे रुग्णालयातील डॉक्टरची आत्महत्या:गळफास घेत संपवले आयुष्य, मानसिक तणावात असल्याची माहिती