Headlines

DRDO Agni MIRV Test Success

6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी जाणून घ्या, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत… राष्ट्रीय (NATIONAL) 1. पंतप्रधान मोदी 3 राज्यांच्या दौऱ्यात कर्नाटक आणि तेलंगणामध्ये पोहोचले पंतप्रधान मोदी 10 आणि 11 मे रोजी कर्नाटक, तेलंगणा आणि गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात सर्वात आधी पंतप्रधान बंगळूरुजवळ तेलंगणामध्ये पोहोचतील. हैदराबादमध्ये त्यांनी…

Read More

मुंबईच्या राजकारणात ‘ठाणे पॅटर्न’ची एन्ट्री:22 जिल्ह्यांत दौरा; उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात 100 मतदारसंघांवर शिंदेसेनेचे लक्ष

ठाणे जिल्ह्यात शिंदेसेनेचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आता मुंबईच्या रणांगणात “मुख्य समन्वयक’ म्हणून उतरले आहेत. १६ मे २०२६ पासून सुरू होणाऱ्या या दोन महिन्यांच्या विशेष मोहिमेत मुंबईचा “रिमोट कंट्रोल’ त्यांच्या हाती असणार आहे. दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे २२ जिल्ह्यांतील ७० विधानसभा मतदारसंघांत जाऊन थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. राजकीय वर्तुळात याला “ठाणे…

Read More

अनाथ लेकीही अभिमानाने म्हणणार, "मी माहेरी चालले’:पुणे-मुंबई महामार्गावर "माहेरवाशी’ प्रकल्प

ज्या मुलीच्या डोक्यावर आईची माया नाही आणि पाठीशी वडिलांचा आशीर्वाद नाही, तिची व्यथा शब्दांत मांडणे कठीण असते. सासरी गेल्यावर जेव्हा ही मुलगी आपल्या नणंद किंवा जाऊबाईंना माहेरी येता-जाताना पाहते, तेव्हा तिच्या मनात एकच ठसठसणारी कळ उठते, “काहीही असो, माझंही एक माहेर असतं तर…’ अनाथ विवाहित लेकींच्या मनातील हीच आर्त हाक आता प्रत्यक्षात उतरणार आहे. तर्पण…

Read More

बातमी बदलाची:75 गावांनी पाणी साठवले; शेती उत्पन्नही तिप्पट झाले, राज्यात जालन्यात 2016 मध्ये 4 हजार पाण्याच्या टँकर्सची गरज भासली होती

मी महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील पासोडी गावात आहे. गेल्या आठवडाभर येथील सरासरी तापमान ४०-४१ अंश सेल्सियसच्या आसपास होते. मराठवाड्याचा हा भाग देशातील सर्वाधिक दुष्काळग्रस्त भागांमध्ये गणला जातो. मात्र या वेळी कडक उन्हाळ्यातही येथे पाण्याची कोणतीही टंचाई जाणवली नाही. गावातील सर्व विहिरींमध्ये पुरेसे पाणी आहे. ग्रामपंचायतीच्या विहिरींमधून पाइपद्वारे लोकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचत आहे. हे सुखद चित्र केवळ…

Read More

एनसीआरबी रिपाेर्ट:गृहिणींच्या आत्महत्या दुप्पट; दर तासाला 5 जणींचा शेवट, आत्महत्येचे सर्वात माेठे कारण काैटुंबिक वाद, विवाहित महिलांचे प्रमाण अधिक

देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर शासनासह सर्वत्रच चर्चा केली जाते. मात्र, ‘एनसीआरबी’च्या ताज्या अहवालातून एक अत्यंत धक्कादायक आणि अस्वस्थ करणारे वास्तव समोर आले आहे. देशात शेतकऱ्यांच्या (६.२%) तुलनेत गृहिणींच्या (१३%) आत्महत्यांचे प्रमाण दुप्पट झाले आहे. २०२४ मध्ये तब्बल २२,११३ गृहिणींनी जीवन संपवले असून, दर तासाला ५ विवाहिता मृत्यूला कवटाळत आहेत. चूल आणि मूल सांभाळणाऱ्या या…

Read More

अमरावतीजवळ डबा पार्टीस गेलेल्या भावंडांसह चार जणांचा तलावात बुडून मृत्यू:घातखेडा तलावातील गाळात एकामागाेमाग चाैघेही अडकले

अमरावतीमधील खोलापुरी गेट परिसरातील दहा मुले-मुली रविवारी शहरापासून १० किमी अंतरावरील घातखेडा तलावाजवळ डबा पार्टीसाठी गेले होते. जेवणानंतर पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या १२ वर्षीय मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात एकामागोमाग चौघेजण तलावातील गाळात अडकले. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. सोनाली नरेंद्र जोशी (१६), आदित्य ऊर्फ मानव नरेंद्र जोशी (१३), पायल बबलू पंडित (२१), यश गजानन काकणे (१३, सर्व…

Read More

‘झीरो कॉस्ट’ मॉडेल:नागपूर मेट्रोचा जागतिक विक्रम! रुळांवर वीजनिर्मिती; वर्षाकाठी 2,900 हून अधिक झाडे लावण्याइतका पर्यावरणाला फायदा

नागपूरने पर्यावरण रक्षणाच्या दिशेने एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. नागपूर मेट्रो (महा मेट्रो) आता प्रवासी वाहतूक यंत्रणेसह चक्क एक ‘फिरते पॉवर हाऊस’ बनली आहे. रुळांच्या मधल्या जागेचा आणि पिलर्सचा कल्पकतेने वापर करून सौर ऊर्जा निर्मिती करणारी ही महाराष्ट्रातील पहिली आणि देशातील अत्यंत नावीन्यपूर्ण मेट्रो ठरली असल्याची माहिती वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (कॉर्पोरेट संचार) अखिलेश हळवे…

Read More

प्रगतिशील शेतकरी:दुष्काळी माळरानावर केशर आंब्याची बाग; 35 एकरांतून 1 कोटी उत्पन्न, लातूरच्या शेतकऱ्याचा जिद्दी प्रयोग

मराठवाडा म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो पाचवीला पुजलेला दुष्काळ. पण याच मातीत जिद्द असेल तर काय घडू शकते, याचे उत्तम उदाहरण लातूरच्या एका तरुण शेतकऱ्याने घालून दिले. निलंगा तालुक्यातील तांबाळा येथील नरसिंग मल्लिकार्जुन लंगोटे या शेतकऱ्याने आपल्या 35 एकर खडकाळ माळरानावर 12 हजार केशर आंब्यांची लागवड केली. विशेष म्हणजे, या वर्षी केवळ 6 हजार झाडांतून…

Read More

शेजारील देशांत पेट्रोल 450 रुपये, आपण वेळीच सावध व्हायला हवे:पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती आणि जागतिक स्तरावरील अस्थिरतेचा मोठा फटका आता भारतीय जनजीवनाला बसू लागला आहे. राज्यात एकीकडे पेट्रोल-डिझेलची टंचाई जाणवत असतानाच, दुसरीकडे घरगुती गॅससाठीही नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील सभेतून देशाला अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले असून, अर्थव्यवस्थेवरचा ताण कमी करण्यासाठी ‘संयम आणि बचतीचा’ मार्ग…

Read More

'ते पन्नास दिवस' कादंबरीची प्रेरणा स्थलांतरित मजुरांचा संघर्ष:प्रगतिशील लेखक संघाच्या 'गाठभेट लेखकाशी' कार्यक्रमात पवन भगत यांचे मत

अमरावती: ‘ते पन्नास दिवस’ या कादंबरीचे लेखक पवन भगत यांनी सांगितले की, कोरोना काळातील लॉकडाउनमध्ये स्थलांतरित मजुरांच्या वाट्याला आलेला जीवघेणा संघर्षच त्यांच्या कादंबरीची प्रेरणा ठरला. प्रगतिशील लेखक संघाच्या चांदूर रेल्वे शाखेतर्फे आयोजित ‘गाठभेट लेखकाशी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. करोना महामारीच्या काळात भारताच्या विविध महानगरांत स्थलांतरित मजुरांचे झालेले हाल अत्यंत वेदनादायी होते. बंद पडलेली उद्योग…

Read More