Headlines

उजनी 15 दिवस उशिरा ‘मायनस’मध्ये ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठ्याची कसरत:गतवर्षी एप्रिलमध्ये आले होते मृतसाठ्यात, सध्या 63 टीएमसी पाणीसाठा शिल्लक‎

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातून उन्हाळी आवर्तनासाठी पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पाणी पातळीत झपाट्याने घट होत आहे. गेल्या १२ दिवसांत तब्बल १२ टीएमसी पाणी कमी झाले असून, मंगळवारी रात्री धरणाने उपयुक्त पाणीसाठ्यातून मृत साठ्यात (मायनस) प्रवेश केला आहे. सद्यस्थितीत धरणातून विविध सिंचन योजना आणि नदीद्वारे सुमारे १० हजार क्युसेक विसर्ग सुरू असल्याने प्रशासनासमोर ऑगस्टपर्यंत…

Read More

नसरापूर येथील घटनेचे पंढरीत तीव्र पडसाद:फासणाऱ्या घटनेचा सर्वपक्षीय निषेध; स्त्री सन्मानासाठी पंढरपूरकर एकवटले‎

नसरापूर येथील निष्पाप बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचारामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद पंढरपुरात उमटले असून, आज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्वपक्षीय पदाधिकारी, विविध संघटना आणि संतप्त नागरिकांनी एकत्र येत या घृणास्पद कृत्याचा जाहीर निषेध केला. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे जनमानसात प्रचंड संतापाची लाट आहे. भर चौकात जमलेल्या आंदोलकांनी “आरोपीला…

Read More

बंगालमध्ये भाजपला TMC पेक्षा 32 लाख अधिक मते:SIR मुळे प्रत्येक जागेवर 30 हजार मतदार कमी झाले, 176 जागांवर तेवढ्याच फरकाने विजय

पश्चिम बंगालमध्ये भाजपला एकूण 2 कोटी 92 लाख 24 हजार 804 मते मिळाली आहेत. तृणमूल काँग्रेसला 2 कोटी 60 लाख 13 हजार 377 मते मिळाली, म्हणजे एकूण मतांचा फरक 32 लाख 11 हजार 427 राहिला. 293 जागांनुसार, भाजपला प्रत्येक जागेवर सरासरी 10,960 मते जास्त मिळाली. राज्यात स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन (SIR) मुळे एकूण 91 लाख मते…

Read More

खतांच्या किमतीत 67 टक्के वाढ:आखाती युद्धामुळे जगाच्या पोशिंद्याचे कंबरडे मोडले, कच्च्या मालाच्या दरात 600 टक्क्यांची वाढ; खरिपापूर्वीच शेतकरी संकटात‎

‘जगाचा पोशिंदा’ म्हणून ओळखला जाणारा शेतकरी आज स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडताना दिसत आहे. वाढता खर्च, घटते उत्पन्न आणि अनिश्चिततेचे सावट या तिहेरी फटक्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रासायनिक खते तयार करण्यासाठी ल . पुरवठा साखळी विस्कळीत, आयातीवर परिणाम रासायनिक खतांच्या निर्मितीसाठी नायट्रोजन, अमोनिया, पोटॅश, सल्फर आणि फॉस्फरिक ॲसिड या महत्त्वाच्या घटकांची आवश्यकता असते….

Read More

न्यायाधीशांनी न्यायदान, शिस्त, संवेदनशीलतेचा वारसा जपावा:प्रधान जिल्हा न्या. शिवाजी कचरे यांचे आवाहन‎

अहिल्यानगर न्यायाधीशांनी आपल्या कार्यकाळात न्यायदान, शिस्त आणि संवेदनशीलतेचा जो आदर्श निर्माण केलेला असतो, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सत्कार सोहळे हे एक उत्तम माध्यम आहे. न्यायाधीश आणि वकील (बार) यांच्यातील सौहार्दाचे संबंध न्यायव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी आवश्यक आहेत, असे आवाहन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे यांनी केले. अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने जिल्हा न्यायालयातून बदली झालेले, नव्याने…

Read More

नागरिकांना अखंडित वीज द्या, उडवाउडवीची उत्तरे देऊ नका:सभापती प्रा. राम शिंदे यांचे महावितरणला निर्देश

कर्जत-जामखेड तालुक्यातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांचा संयम सुटला असून, आता विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी थेट महावितरणच्या रडारवर घेतले आहे. “नागरिकांना अखंडित वीज मिळालीच पाहिजे, उडवाउडवीची उत्तरे देऊ नका, तातडीने कृती करा, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. विशेषतः सायंकाळी ६ ते १० या वेळेत वीज खंडित झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा…

Read More

एक कोटींची तरतूद असूनही रस्ते पॅचिंगचा महापालिकेला विसर:मध्य अहिल्यानगर शहरासह उपनगरांमधील प्रमुख रस्त्यांवर खड्डे‎

शहरात कोट्यवधी रुपये खर्चून रस्त्यांची कामे सुरू असली तरी अद्यापही मध्यशहर व उपनगरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर, अंतर्गत रस्त्यांवर खड्डे कायम आहेत. त्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागते. महापालिकेने खड्डे बुजविण्यासाठी सुमारे १ कोटी रुपयांच्या निविद . मध्य शहरातील सर्जेपुरा ते भिंगारवाला चौक रस्त्याचे काम ठप्प आहे. त्यामुळे बाजारपेठेकडे जाणाऱ्या या प्रमुख रस्त्याची दयनीय अवस्था झाली…

Read More

पोलिसांपुढे अपुऱ्या मनुष्यबळाचे आव्हान:कायदा व सुव्यवस्था राखण्यास प्राधान्य- अधीक्षक सुदर्शन‎

जिल्ह्याचा विस्तार मोठा असून येथील गुन्हेगारीचे प्रमाणही जास्त आहे. ५० लाख लोकसंख्येच्या तुलनेत केवळ ३२०० पोलिसांचे अपुरे मनुष्यबळ आणि सततचे व्हीआयपी दौरे व त्यासाठी बंदोबस्त हे पोलिस दलासमोरील मोठे आव्हान असल्याचे मत नूतन पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी व्यक्त केले. कोणतीही अनुचित घटना घडल्यास तत्काळ कारवाई करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ न देण्याला…

Read More

सज्जादा नशीन सय्यद फरीद अहमद निजामी यांनी घेतली दर्ग्यांची माहिती:खुलताबादमध्ये उत्साहात स्वागत, दर्गा कमिटीच्या वतीने केला सत्कार‎

ऐतिहासिक व सुफी संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खुलताबाद शहरात दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन औलिया दर्ग्याचे सज्जादा नशीन सय्यद फरीद अहमद निजामी यांचे आगमन झाले. त्यांच्या समवेत ॲड. महबूब निजामी यांचीही उपस्थिती होती. या निमित्ताने शहरातील विविध . खुलताबादमध्ये आगमन होताच सय्यद फरीद अहमद निजामी यांनी सर्वप्रथम हजरत बुरहानुद्दीन गरीब (रह.) यांच्या पवित्र दर्ग्याला भेट…

Read More

चित्ररथ, प्रभात फेरीतून महाराष्ट्राच्या संस्कृतीची जपणूक:लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळातर्फे मिरवणूक‎

लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित तिन्ही विद्याशाखांतर्फे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्यात आला. जिजामाता प्राथमिक शाळेने “पर्यावरण रक्षण काळाची गरज’ दाखवणारा चित्ररथ तर लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयाने “मानव आणि वन्यजीव संघर्ष’, जिजामाता कन्या विद्यालयाच्या वतीने “महाराष्ट्र ही संतांची भूमी व छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम भेट’ यांचा देखावा असलेला चित्ररथ सादर…

Read More