Headlines

एक कोटींची तरतूद असूनही रस्ते पॅचिंगचा महापालिकेला विसर:मध्य अहिल्यानगर शहरासह उपनगरांमधील प्रमुख रस्त्यांवर खड्डे‎



शहरात कोट्यवधी रुपये खर्चून रस्त्यांची कामे सुरू असली तरी अद्यापही मध्यशहर व उपनगरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर, अंतर्गत रस्त्यांवर खड्डे कायम आहेत. त्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागते. महापालिकेने खड्डे बुजविण्यासाठी सुमारे १ कोटी रुपयांच्या निविद

.

मध्य शहरातील सर्जेपुरा ते भिंगारवाला चौक रस्त्याचे काम ठप्प आहे. त्यामुळे बाजारपेठेकडे जाणाऱ्या या प्रमुख रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. दिल्लीगेट ते जुनी महापालिका रस्त्यावरही खड्डे आहेत. सावेडी उपनगरातील टीव्ही सेंटर ते भिस्तबाग चौक रस्त्याचाही पुरता बोजवारा उडाला आहे. मिस्किन मळ्यात रस्त्याचे काम अर्धवट असल्याने रस्ता पूर्णपणे उखडला गेला आहे. प्रोफेसर चौक ते प्रेमदान चौक रस्त्याचीही दुर्दशा झाली आहे. अनेक महिन्यांपासून ही परिस्थिती असताना व खड्डे बुजविण्यासाठी निविदा मंजूर असतानाही खड्डे बुजवण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे.

शहरात सुमारे दीडशे कोटींच्या निधीतून प्रमुख रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यातील २४ पैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, सर्जेपुरा, जुने जिल्हाधिकारी कार्यालय रस्ता, एकविरा चौक ते तपोवन रस्ता, भिंगारवाला चौक ते सर्जेपुरा रस्ता अशा काही रस्त्यांची कामे रखडली आहेत. काही कामे सुरू असली तरी तीही संत गतीने सुरू असल्याने व काही कामे थांबल्याने या रस्त्यांचीही दयनीय अवस्था झाली आहे.

तत्काळ पॅचिंग न केल्यास रस्त्यावर उतरू ^ रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याबाबत मनपा प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी प्रभाग सहा मधील आम्ही सर्व नगरसेवकांनी शहर अभियंत्यांची भेट घेऊन पॅचिंग सुरू करण्याची मागणी केली आहे. लवकरच पॅचिंग सुरू केले जाणार आहे. मात्र, तत्काळ खड्डे न बजावल्यास आम्ही रस्त्यावर उतरून भर उन्हात आंदोलन करणार आहोत. – करण कराळे, नगरसेवक



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *