![]()
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (एडीसीसी) आता प्रशासकाची नियुक्ती अटळ आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देण्याची याचिका फेटाळली आहे. न्यायालयाचा आदेश मिळताच सहकार विभाग प्रशासकाची नियुक्ती करेल. न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ रविवार, ४ ऑक्टोबर रोजी संपला होता. वेळेत निवडणूक न झाल्याने सत्ताधाऱ्यांनी मुदतवाढीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. गेल्या अडीच वर्षांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमधील वादामुळे बँकेची निवडणूक वेळेत होऊ शकली नाही. सत्ताधाऱ्यांनी सहकार विभागाच्या कामकाजावर बोट ठेवून मुदतवाढ मागितली होती, तर विरोधकांनी प्रशासक नेमण्याची मागणी केली होती. बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे यांनी सांगितले की, या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार नाही. ते म्हणाले की, आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत आणि प्रक्रियेत कोणी अडथळा आणल्यास न्यायालयीन मार्ग स्वीकारू.
Source link
उच्च न्यायालयाने फेटाळली अमरावती जिल्हा बँकेच्या संचालकांची याचिका:मुदतवाढ टळल्याने आता बँकेवर कोणत्याही क्षणी प्रशासक नेमणूक अटळ