![]()
अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीत उभी फूट पडली आहे. दोन्ही गटांकडून एकापेक्षा जास्त उमेदवारांनी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीत ही जागा शिवसेनेसाठी आहे, तरी भाजपचे शेखर भोयर, संगीता शिंदे-बोंडे आणि युवा स्वाभिमान पार्टीच्या ॲड. प्रीती रेवणे-बनारसे यांनी उमेदवारी जाहीर केली. शिवसेनेतूनही मावळते आमदार किरण सरनाईक व प्रा. श्रीकांत देशपांडे यांनी तिकीटावर दावा केला आहे. महाविकास आघाडीतही एकवाक्यता नाही. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दत्तात्रय लहाने यांना उमेदवारी दिली. तर, माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या कन्या अदिती पोहरे-देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत तिकीट मिळवले. ही निवडणूक पूर्वी शिक्षक संघटनांमार्फत लढवली जायची. आता अनेक उमेदवारांनी राजकीय पक्षांचा झेंडा हाती घेतल्याने निवडणुकीला राजकीय वळण मिळाले आहे.
Source link
अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महायुती-मविआत उभी फूट:दोन्ही गटांकडून एकापेक्षा जास्त उमेदवार; शिवसेना, भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाचेही आव्हान