Headlines

नांदगाव पेठेत शेतातील वीजपुरवठा खंडित:महावितरणच्या दुरवस्थेमुळे शेतकरी संतप्त, कार्यालयावर धडक देत दुरुस्तीची मागणी




नांदगाव पेठ परिसरात महावितरणच्या वीजवाहिन्या आणि यंत्रणेच्या दुरवस्थेमुळे शेतातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी महावितरण कार्यालयावर धडक दिली. त्यांनी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करत वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या अनेक दिवसांपासून शेतांमध्ये वीज नाही. यामुळे त्यांना अडचणी येत आहेत. यावर्षी कमी पावसामुळे जलसंकट निर्माण झाले आहे. पिके वाचवण्यासाठी विहीर, नदी आणि इतर जलस्रोतांतून पाणी द्यावे लागत आहे. वीज नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक दिवस वीज बंद असल्याने पिके वाळण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कार्यालयावर जाऊन आपली समस्या मांडली. त्यांनी वीजपुरवठा तातडीने नियमित करण्याची मागणी केली. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब देशमुख, ज्ञानेश्वर बारस्कर, नंदकिशोर कुकडे, प्रल्हाद इखार, विशाल देशमुख, प्रशांत दारोकार, चेतन दारोकार, गुड्डु शेख यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *